या त्रुटींमुळे डेटा सुरक्षा आणि ग्राहक सेवेत धोका निर्माण झाला होता. मात्र, आता RBI ने बँकेला मोठा दिलासा दिला आहे. बँकेवरील बंदी हटवण्यात आली आहे. RBI ने 2022 आणि 2023 मध्ये बँकेच्या IT टेक्नॉलॉजीची तपासणी केली होती. यामध्ये IT इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅच आणि चेंज मॅनेजमेंट, यूजर ॲक्सेस मॅनेजमेंट, डेटा सुरक्षा आणि डेटा लीक प्रतिबंधक रणनीतींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या.
advertisement
या IT त्रुटींमुळे बँकेच्या कोअर बँकिंग सिस्टीम आणि डिजिटल चॅनेलमध्ये वारंवार व्यत्यय येत होते, ज्यामुळे ग्राहकांना गैरसोय झाली. 15 एप्रिल 2024 रोजी बँकेच्या सेवांमध्ये समस्या आली, ज्यामुळे ग्राहकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर बँकेवर कारवाई करण्यात आली आणि नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली. आता RBI ने बँकेवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. याचा अर्थ बँक आता नवीन क्रेडिट कार्ड जारी करू शकते आणि नवीन ग्राहकांना ऑनलाइन तसेच मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून आपल्या सेवा देऊ शकते.
RBI चा हा निर्णय बँकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे बँकेला पुन्हा एकदा आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. तसेच, ग्राहकांनाही अधिक चांगली सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. कोटक महिंद्रा बँकेसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. RBI ने बँकेच्या IT सिस्टीममधील सुधारणा आणि ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलले होते. आता बँकेने सर्व त्रुटी दूर केल्यामुळे RBI ने बंदी हटवली आहे.