या गंभीर बाबीची दखल घेत, महिला व बालविकास विभागाने या सर्व २६ लाख लाभार्थ्यांची यादी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठवली आहे. आता या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. या पडताळणीनंतरच कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे, हे स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पडताळणी मोहीम राबवण्यात येत आहे.
advertisement
या तपासणीत जे लाभार्थी अपात्र आढळतील, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे, जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील, त्यांना मात्र योजनेचा लाभ पुढेही नियमितपणे सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी ही पडताळणी मोहीम आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. मात्र, प्राथमिक तपासणीत एवढ्या मोठ्या संख्येने अपात्र लाभार्थी आढळल्याने, योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील काळात या पडताळणीतून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे. 2.29 कोटी महिलांना सध्या योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र त्यांचे देखील E KYC केलं जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
छाननीनंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्यावर मुख्यमंत्री फणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांपैकी ज्यांनी लाभ घेतला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तर ज्या लाडक्या भावांनी बहिणींच्या नावे लाभ घेतला त्यांच्यावर देखील कारवाई केली जात आहे. त्यामुळे तुम्ही अपात्र असाल तर आधीच अर्ज मागे घ्या, असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं.