भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) पर्सनल माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणीला निरुत्साहित करण्यासाठी धारकाच्या फोटो आणि QR कोडसह आधार कार्ड जारी करण्याचा विचार करत आहे. आधारवरील परिषदेत, UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भुवनेश कुमार म्हणाले की, हॉटेल, कार्यक्रम आयोजक इत्यादी संस्थांकडून ऑफलाइन पडताळणीला निरुत्साहित करण्यासाठी आणि पर्सनल गोपनीयता राखताना आधार वापरून वय पडताळणी प्रक्रिया वाढवण्यासाठी प्राधिकरण डिसेंबरमध्ये एक नवीन नियम आणण्याचा विचार करत आहे.
advertisement
नवीन आधार कार्ड कसे दिसेल?
कुमार म्हणाले, "कार्डवर अतिरिक्त डिटेल्स का आवश्यक आहेत याचा आम्ही विचार करत आहोत. त्यात फक्त एक फोटो आणि एक QR कोड असावा. आम्ही अधिक माहिती छापली तर लोक त्यावर विश्वास ठेवतील आणि ज्यांना त्याचा गैरवापर कसा करायचा हे माहित आहे ते असे करत राहतील." याचा अर्थ असा की आधार कार्डमध्ये आता फक्त तुमचा फोटो आणि एक QR कोड असेल, ज्यामुळे तुमची सर्व माहिती गोपनीय आणि सुरक्षित राहील.
पडताळणीतील नियमांचे उल्लंघन
आधार कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन पडताळणीसाठी गोळा केली जाऊ शकत नाही, वापरली जाऊ शकत नाही किंवा संग्रहित केली जाऊ शकत नाही. तरीही, अनेक संस्था आधार कार्डच्या झेरॉक्स गोळा करतात आणि सांभाळून ठेवतात. अशा परिस्थितीत, आधारची फसवणूक किंवा गैरवापर होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी, आता सर्व आधार माहिती गोपनीय ठेवली जात आहे, जेणेकरून ऑफलाइन पडताळणीवर बंदी घालून, लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखता येईल.
आधार पडताळणीचे नियम काय आहेत?
देशात आधार पडताळणी धारकाच्या संमतीशिवाय करता येत नाही आणि असे करणाऱ्या कोणत्याही संस्थेला ₹1 कोटी पर्यंत दंड होऊ शकतो. ही संमती बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळवावी लागेल, जी धारकाकडून OTP, फिंगरप्रिंट, आयरिस इत्यादींद्वारे मिळवता येते. फक्त UIDAI द्वारे अधिकृत संस्था आणि बँका आधार व्हेरिफिकेशन करू शकतात. यूझर्सची इच्छा असेल तर ते त्यांचा बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकतात आणि फक्त OTP वापरला जाईल. आधार डेटाचा गैरवापर करणाऱ्या कोणालाही मोठा दंड देखील होऊ शकतो.
