मिस्ड कॉलद्वारे EPF बॅलन्स कसा तपासायचा (How To Check EPF Balance Through a Missed Call):
पायरी 1: तुमच्या UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) शी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.
पायरी 2: दोन रिंग झाल्यावर कॉल आपोआप कट होईल आणि यासाठी तुम्हाला कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.
advertisement
पायरी 3: काही वेळातच तुम्हाला एक SMS प्राप्त होईल. ज्यामध्ये तुमच्या मागील EPF योगदानाची आणि तुमच्या सध्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या बॅलन्सची माहिती दिलेली असेल.
ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि 24x7 उपलब्ध आहे.
Yes Bankने दिली मोठी बातमी; आता टॉप मॅनेजमेंटमध्ये होणार फेरबदल
SMS द्वारे EPF बॅलन्स कसा तपासायचा (How to Check EPF Balance Through SMS):
EPFO एसएमएस-आधारित सुविधा देखील पुरवते. ज्यामुळे तुम्ही काही सेकंदात तुमच्या खात्याचा तपशील पाहू शकता.
पायरी 1: तुमच्या फोनमधील SMS मध्ये जा.
पायरी 2: खालील फॉरमॅटमध्ये मेसेज लिहा: EPFOHO UAN
पायरी 3: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून हा मेसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
डीफॉल्टनुसार तुम्हाला इंग्रजीमध्ये उत्तर मिळेल. तथापि EPFO अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करते. तुमच्या आवडीच्या भाषेत संदेश मिळवण्यासाठी संदेशाच्या शेवटी त्या भाषेच्या नावाचे पहिले तीन अक्षरे जोडा.
उदाहरणार्थ: मराठीमध्ये संदेश मिळवण्यासाठी टाइप करा: EPFOHO UAN MAR
