ज्यांची नेटवर्थ हाय आहे त्यांच्यासाठीच एलआयसीने ही पॉलिसी आणली आहे. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ते ही पॉलिसी घेऊ शकतात. एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसी असं तिचं नाव आहे. त्या पॉलिसीत चार वर्षं पैसे गुंतवल्यास मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एक कोटी रुपये मिळू शकतात. एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसी हा एक नॉन लिंक्ड प्लॅन आहे.
advertisement
(UPS : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीमची घोषणा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय)
एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसीमध्ये पैसे गुंतवून त्या पॉलिसीहोल्डरला सर्व्हायव्हल बेनिफिट्स मिळतात. पॉलिसीहोल्डरचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनाही विम्याची रक्कम मिळते. त्याशिवाय पॉलिसीहोल्डरला ती पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर एकरकमी एक कोटी 34 लाख रुपये मिळतात. त्यामुळे ही पॉलिसी घेणं ग्राहकांना उपयुक्त ठरू शकतं. तुम्ही या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर थोडक्यात गणित समजून घेऊ या. एलआयसी कॅलक्युलेटरच्या माहितीनुसार, एखादी व्यक्ती 29 वर्षांची असेल आणि तिने 20 वर्षांसाठी एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसी घेतली असता टॅक्ससह 61,438 रुपये प्रीमियम भरावा लागेल. दुसऱ्या वर्षीपासून दरमहा 60,114 रुपये गुंतवावे लागतील. पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्या व्यक्तीला एक कोटी 34 लाख रुपये मिळतील. एक कोटी रुपये सम अश्युअर्डसाठी त्या व्यक्तीला चार वर्षांपर्यंत महिन्याला सुमारे 60,000 रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर त्यांना रिटर्न मिळण्यास सुरुवात होईल. आधीच माहिती दिल्याप्रमाणे ज्यांची नेटवर्थ उत्तम आहे, त्यांच्यासाठीच एलआयसीने ही पॉलिसी आणली आहे. ग्राहक या पॉलिसीमध्ये वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक प्रीमियम भरू शकतात. ही पॉलिसी घेण्यासाठी ग्राहकाचं वय किमान 18 वर्षं असणं आवश्यक आहे.