UPS : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीमची घोषणा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
केंद्र सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीमची घोषणा केलीय. केंद्र सरकारच्या २३ लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीमची घोषणा केलीय. केंद्र सरकारच्या २३ लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा युपीएस यापैकी एक पेन्शन योजना निवडता येईल. युपीएस योजनेत सरकारकडून १८.५ टक्के योगदान दिले जाईल. ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल.
युपीएस योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांनी एका निश्चित रकमेची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांना या योजनेत वेतनाच्या ५० टक्के अश्युअर्ड पेन्शन मिळेल. २५ वर्षांपर्यंत ज्यांची सेवा झाली असेल त्यांना निवृत्तीच्या आधीच्या १२ महिन्यांच्या वेतनाची सरासरी दिली जाईल. १० वर्षे ते २५ वर्षांच्या सेवेत त्यानुसारच पेन्शन दिली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा पेन्शनचा लाभ मिळेल. पत्नीला ५० टक्क्याच्या ६० टक्के पेन्शन दिली जाईल. कोणत्याही केंद्रीय कर्मचाऱ्याला किमान १० हजार रुपये पेन्शन मिळेल. तसंच महागाईच्या आधारेही पेन्शन दिली जाईल. कर्मचाऱ्यांना एकत्रित अशी सुपर एनुएशन रक्कमही मिळेल.
advertisement
युपीएस योजनेमध्ये फॅमिली पेन्शन, किमान पेन्शन, निवृत्तीनंतर एकत्र सुपर एन्युएशन रक्कम यांचाही लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीमला मंजुरी दिलीय. या योजनेंतर्गत ५० टक्के पेन्शन निश्चित करणं हा पहिला उद्देश आहे. तर दुसरा उद्देश हा फॅमिली पेन्शन आहे. विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना एनपीएस आणि युपीएस या दोन पेन्शन योजनांपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2024 8:39 PM IST
मराठी बातम्या/मनी/
UPS : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीमची घोषणा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय