महाकुंभातील गर्दीचा विक्रम
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, प्रयागराज महाकुंभात एका महिन्यात तब्बल ५० कोटी श्रद्धाळूंनी स्नान केले. हे भाविक 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चा संदेश घेऊन गेले आहेत. महाकुंभासाठी १५,००० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असला तरी त्याचा परिणामस्वरूप उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.
advertisement
इंग्रजांनी लूट केली नसती तर आज भारत किती श्रीमंत असता? रक्कम वाचून डोळे गरगरतील
५० ते ५५ कोटी श्रद्धाळूंच्या उपस्थितीमुळे राज्यातील विविध उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली. महाकुंभाच्या नावाने मिळालेल्या निधीचा उपयोग फक्त कुंभासाठीच नाही, तर प्रयागराजच्या सौंदर्यीकरणासाठीही करण्यात आला, असेही मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.
2008 पेक्षा वाईट ठरू शकते 2025! गुंतवलेले पैसे आताच काढून घ्या, नाही तर...
गडकरींना दिले श्रेय
महाकुंभ काळात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आले. रेल्वे आणि विमानतळावरील व्यवस्थेसोबतच रस्ते वाहतुकीसाठीही उत्तम सोय करण्यात आली होती. याचे संपूर्ण श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाते. हे फक्त डबल इंजिन सरकारमुळेच शक्य झाले," असे मुख्यमंत्री योगी यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण शहराचा नाश करणारा लघुग्रह, पृथ्वीवर कधी आदळणार; Photo शेअर करत NASAने तारीखच सांगितली
महाकुंभ –विकास आणि श्रद्धेचा संगम
योगी सरकारचा दावा आहे की, महाकुंभ हा केवळ धार्मिक नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरला आहे. विरोधक सरकारवर टीका करत असले, तरी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी महाकुंभाला दिलेल्या प्रतिसादामुळे उत्तर प्रदेशच्या विकासाला चालना मिळाल्याचा सरकारचा दावा आहे.