धाराशिव - अनेकदा शेती असूनही त्यातून चांगले उत्पन्न मिळत नसल्याने अनेक जण वेगळ्या व्यवसायाचा मार्ग स्विकारतात. पर्यायी आपला जिल्हा, राज्यही सोडतात आणि दुसऱ्या ठिकाणी नवीन सुरुवात करतात आणि त्यात जिद्दीने, मेहनतीने काम करत यशस्वी होतात. आज अशाच व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
घरी शेती असूनही त्यातून चांगले उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे रोजगारासाठी शेकडो किलोमीटर दूर येऊन एका व्यक्तीने जिलेबीचा व्यवसाय सुरू केला. आता दिवसाकाठी ते 2 ते 3 हजार रुपयांचे उत्पन्न कमावत आहेत. तसेच दोन कामगारांना रोजगारही देत आहे. किशोर चौधरी यांची ही कहाणी आहे.
advertisement
किशोर चौधरी हे राजस्थानातून रोजगारासाठी महाराष्ट्रात आले. त्यांच्याकडे शेतजमीन असूनही त्यातून फारसे उत्पन्न हाती लागत नव्हते. त्यात राजस्थान, हरियाणा या ठिकाणची जिलेबी देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांनी याच जिलेबीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी थेट पुणे गाठले. त्यानंतर मित्राच्या ओळखीने ते धाराशिव जिल्ह्यातल्या भूम शहरात आले आणि याठिकाणी जिलेबीचा व्यवसाय सुरू केला.
17 वर्षांच्या मुलाचं निधन, बापानं दिली अनोखी श्रद्धांजली, हाती घेतलेल्या 'या' मिशनचं होतंय कौतुक
मागील 3 वर्षांपासून ते जिलेबीचा व्यवसाय करत आहेत. एकेकाळी स्वतःला रोजगार उपलब्ध होत नव्हता म्हणून सुरू केलेला जिलेबीचा व्यवसाय सुरू केला आणि आता त्यांच्याकडे 2 कामगार काम करतात. भूम शहरातील अनेक मंडळी आवर्जून जिलेबी खाण्यासाठी या दुकानात येतात. जिलेबीची गुणवत्ता आणि चव यामुळे त्यांची जिलेबी प्रसिद्ध झाली असून ते दिवसाकाठी 3 हजार रुपयांची उलाढाल होत आहे.
एकेकाळी शेतीतून उत्पन्न नसताना त्यांनी आपले राज्य सोडत महाराष्ट्रात येत जिलेबीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आज ते चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत असून मेहनतीने त्यांनी याठिकाणी आपला व्यवसाय यशस्वी करुन दाखवला आहे. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.