TRENDING:

Budgetपूर्वीची मोठी टिप, ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टने शेअर बाजारात खळबळ; अर्थसंकल्प सादर होण्याआधी विकत घ्या हे शेअर्स

Last Updated:

Share Market Prediction: केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर होण्यासाठी अवघे 18 दिवस शिल्लक असताना, बजेटपूर्व हालचालींनी शेअर बाजारात उत्सुकता वाढली आहे. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, काही निवडक शेअर्समध्ये बजेटआधी शॉर्ट टर्ममध्ये तेजी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली/मुंबई: 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर होणार असून, त्याआधीच शेअर बाजारात बजेटमध्ये कोणत्या सेक्टरला फायदा होईल याचा अंदाज काढला जात आहे. बजेटमधून ज्या क्षेत्रांना चालना मिळण्याची शक्यता आहे, त्या क्षेत्रांतील शेअर्समध्ये शॉर्ट टर्ममध्ये तेजी येऊ शकते, असा अंदाज ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी व्यक्त केला आहे.

advertisement

मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार, सरकारचा फोकस घरगुती मागणी वाढवणे, खासगी गुंतवणुकीला पुन्हा गती देणे आणि रोजगारनिर्मिती यावर असल्याचे स्पष्ट संकेत बजेटपूर्व तयारीतून मिळत आहेत. त्याचबरोबर आर्थिक शिस्त राखत ‘विकसित भारत 2047’ या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी आर्थिक धोरणे जोडण्यावरही सरकार भर देत आहे.

advertisement

Budget 2026 मध्ये कोणत्या सेक्टर्सना फायदा होऊ शकतो?

ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की, यंदाच्या बजेटमध्ये Ease of Doing Business सुधारण्यासाठी इन्कम टॅक्स, GST, कस्टम्स प्रक्रियांचे सुलभीकरण, क्रेडिट व इन्सेंटिव्हच्या माध्यमातून टार्गेटेड सपोर्ट, कृषी (Agriculture), MSMEs, मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स कॅपिटल खर्च, इलेक्ट्रिक व्हेईकल्स (EVs), रिन्यूएबल एनर्जी यांना दिला जाऊ शकतो.

advertisement

भांडवली खर्चावर सरकारचा जोर कायम

अहवालानुसार खालील क्षेत्रांमध्ये भक्कम कॅपिटल एक्स्पेंडिचर अपेक्षित आहे.

महामार्ग (Highways)

लॉजिस्टिक्स

रेल्वे फ्रेट कॉरिडोर

डिफेन्स

कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स

यासोबतच स्किल डेव्हलपमेंट, ग्रामीण समृद्धी, महिला सक्षमीकरण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) स्वीकार, क्लायमेट अ‍ॅक्शन, डिजिटल फायनान्स हे सगळे भारताच्या आर्थिक वाढीच्या पुढील टप्प्यासाठी महत्त्वाचे घटक मानले जात आहेत.

advertisement

या शेअर्समध्ये येऊ शकते तेजी

वरील सर्व अपेक्षांचा विचार करता मोतीलाल ओसवालने गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. ज्यात TVS Motor, UPL, Bharat Dynamics, M&M Financial Services, Dalmia Bharat या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.

किती परतावा अपेक्षित?

ब्रोकरेज फर्मच्या मते, या शेअर्समध्ये पुढील 1 ते 3 महिन्यांत 5 ते 10 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळू शकते. मात्र हे शेअर्सHigh Riskकॅटेगरीत येतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम लक्षात घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
Budgetपूर्वीची मोठी टिप, ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टने शेअर बाजारात खळबळ; अर्थसंकल्प सादर होण्याआधी विकत घ्या हे शेअर्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल