मुंबई: बँका लोकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारचे कर्ज देतात. त्यापैकी एक म्हणजे गृहकर्ज (Home Loan) होय. स्वतःचं घर खरेदी करण्याचं स्वप्न बहुतांश लोकांचं असतं. परंतु आजकाल मालमत्तेचे दर गगनाला भिडले असल्यामुळे सामान्य लोकांसाठी स्वतःचं घर घेणं कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक बँकेकडून गृहकर्ज घेतात.
advertisement
गृहकर्ज घेतल्यानंतर लोकांना अनेक वर्षे दर महिन्याला EMI (Equated Monthly Installment) भरावी लागते. पण जर एखादा ग्राहक या EMI भरण्यात चूक करतो, तर बँक नेमकं काय करते जाणून घ्या...
पहिला EMI चुकल्यास काय होतं?
जर आपण आपल्या गृहकर्जाची पहिली EMI भरायला विसरलात, तर बँक तात्काळ काही कठोर पाऊल उचलत नाही. बँक अशा प्रकरणांकडे सहानुभूतीने पाहते आणि ते पहिली वेळ असल्यामुळे फक्त रिमाइंडर (स्मरणपत्र) पाठवते.
बँक ईमेल, एसएमएस किंवा फोन कॉलद्वारे आपल्याला वेळेवर EMI भरण्याची आठवण करून देते. या टप्प्यावर आपल्यावर कोणताही दंड किंवा कारवाई होत नाही.
सलग दुसरा EMI चुकल्यास काय होतं?
पहिल्या EMI नंतरही जर आपण दुसऱ्या महिन्याची EMI भरू शकत नसाल, तर बँक अधिक गंभीर होते.
या वेळी बँक आपल्याशी थेट फोन किंवा ईमेलद्वारे संपर्क साधते आणि कारण विचारते की EMI का भरली नाही.
तसेच बँक ग्राहकाला तत्काळ देय रक्कम भरण्यास सांगते आणि आवश्यक असल्यास थोडा वेळ किंवा पर्याय उपलब्ध करून देते.
तिसरा EMI चुकल्यास काय?
-जर आपण सलग तीन महिन्यांच्या EMI भरू शकले नाहीत, तर परिस्थिती गंभीर होते.
-या वेळी बँक आपल्या गृहकर्ज खात्याला NPA (Non-Performing Asset) म्हणून वर्गीकृत करते.
-याचा अर्थ असा की, आपण आता कर्जदार (defaulter) ठरता.
-डिफॉल्टर ठरल्यानंतर तुमचा CIBIL स्कोअर मोठ्या प्रमाणात घसरतो.
-भविष्यात कोणतेही नवीन कर्ज घेणे अत्यंत अवघड होते.
बँक या टप्प्यावर आपल्याला कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवते आणि निश्चित कालावधीमध्ये बाकीच्या सर्व EMI चुकवण्याची अंतिम संधी देते. जर या नोटीसनंतरही आपण देय रक्कम भरली नाही, तर बँकेला कायद्याने आपल्या मालमत्तेवर कारवाई करण्याचा अधिकार असतो.
प्रॉपर्टीवर कारवाई आणि लिलाव
जर ग्राहक नोटीस मिळाल्यानंतरही पैसे भरत नसेल, तर बँक त्या ग्राहकाच्या मालमत्तेची जप्ती आणि लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. अशा वेळी बँक जप्त मालमत्ता विकून आपले कर्ज वसूल करते.
महत्वाचे
- जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर EMI वेळेवर भरणे अत्यावश्यक आहे.
- एक-दोन EMI चुकल्या तर तात्काळ बँकेशी संपर्क साधा आणि परिस्थिती स्पष्ट करा.
- शक्य असल्यास EMI ऑटो-डेबिट सुविधा वापरा, जेणेकरून विसरण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.
गृहकर्जाची EMI चुकवणे छोटं प्रकरण नाही. तीन महिन्यांपर्यंत दुर्लक्ष केल्यास आपण डिफॉल्टर ठरता आणि बँक आपली मालमत्ता जप्त करू शकते. त्यामुळे नेहमी वेळेवर EMI भरा आणि आपल्या घराचे तसेच क्रेडिट हिस्टीचे रेकॉर्ड नीट ठेवा.