देवघर : यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी कठोर परिश्रम हे लागतातच. सोनी टीव्हीवरील दी शार्क टँक या कार्यक्रमात याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. यामध्ये एका आई आणि मुलाच्या जोडीने सहभाग नोंदवला. त्यांचे प्रॉडक्ट्स सर्वांना आवडले. तसेच सर्वांनी त्याचे कौतुक केले आणि ओयोचे फाऊंडर रितेश अग्रवाल यांनी यामध्ये तब्बल 50 लाख रुपयांची गुंतवणूकही केली.
advertisement
मित्रेश शर्मा आणि त्यांच्या आई सरोज शर्मा असे या मायलेकाचे नाव आहे. त्यांच्या हिंबड्स वाटिका प्रायवेट लिमिटेड स्टार्टअप कंपनीच्या प्रॉडक्टला या कार्यक्रमात चांगलीच पसंती मिळाली. याबाबत कंपनीचे फाउंडर मित्रेश शर्मा यांनी लोकल18 बोलताना सांगितले की, मी दिल्लीत अनेक वर्षे दक्षिण कोरियाच्या एका कंपनीत डिजिटल मार्केटिंगचे काम केले.
पण मला माझी स्वतःची कंपनी सुरू करायची होती. त्यामुळे मी 2017 मध्ये डेहराडूनमधील एका छोट्या खोलीतून माझी कंपनी सुरू केली. मी माझे ग्रॅज्युएशन उत्तराखंडमधून पूर्ण केले आणि उत्तराखंड हे वनौषधींसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून, 2017 मध्ये मी प्रथम हर्बल ग्रीन टी सुरू केला, त्यानंतर मी हळूहळू तिथून पुढे गेलो.
कोरोनाकाळातील अनुभव -
कोरोनाकाळात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजारात मंदी आली. अनेक कंपन्या बंद पडल्या. मात्र, मित्रेश शर्मा यांनी हार मानली नाही. लॉकडाऊन दरम्यान ते डेहराडूनहून आपल्या घरी देवघर येथे पोहोचले. याठिकाणी त्यांनी त्यांची आई सरोज देवी यांच्यासोबत घरातूनच आपली स्टार्टअप कंपनी चालवायला सुरुवात केली. दी शार्क टँक शोला जाण्याची इच्छा पहिल्या सीझनपासून होती. मात्र, निवड दोनदा होऊ शकली नाही. तिसऱ्यांदा आम्ही आमच्या उत्पादनांसह आलो आणि अंतिम फेरीत निवडलो.
‘फर्स्ट बर्ड्स ऑर्गेनिकस नावाची कंपनी ग्रीन टी, मध, हर्बल हळद, चाय मसाला, आंब्याचे लोणचे, तुळशी ड्राप, अशी अनेक उत्पादने बनवते. या सर्वात, शार्कच्या टँकमध्ये उपस्थित शार्कला आई सरोज देवी यांनी बनवलेले आंब्याचे लोणचे आणि चहा मसाला खूप आवडला. यामुळे ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनीही या कंपनीमध्ये 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली. आमचे सर्व प्रॉडक्ट्स ऑनलाइन उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनी सुरू झाली तेव्हा वार्षिक उलाढाल लाखभर होती. पण या दिवसात कंपनीची वार्षिक उलाढाल 1 कोटी 80 लाख रुपये आहे. आमची उत्पादने ही फक्त भारतच नव्हे तर यूरोप आणि इतर अन्य देशातही जावेत आणि भारताचे नाव मोठे व्हावे यासाठी प्रयत्न करत आगामी एक वर्षात ऑफलाइन मार्केटिंगही सुरू केली जाणार असल्याचे ते म्हणाले.