मंदिरात जातो असे सांगून 17 वर्षांच्या मुलाची आत्महत्या, मुलगी किंवा पैशांसाठी नव्हे तर..., सुसाइड नोटमध्ये हादरवणारी माहिती

Last Updated:

गिरीश पांडे यांचा 17 वर्षांचा मुलगा सोमेश पांडे हा सायंकाळी 4 वाजता मंदिराचे नाव सांगून घरातून निघाला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला.

फाईल फोटो
फाईल फोटो
अनुज गौतम, प्रतिनिधी
सागर : देशात तरुणाईच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. करिअरच्या दबावातून, परीक्षेच्या दबावातून, अनैतिक संबंधांतून, प्रेमप्रकरणातून अनेक जण आत्महत्या करत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.
एका 17 वर्षांच्या मुलाने धरणात उडी घेत आत्महत्या केली. या मुलाने सुसाइड नोटही लिहिली. ‘माझ्या मृत्यूचे कारण पैसा किंवा कुणी मुलगी नव्हे नव्हे तर माझ्या आत काही सैतानी आत्मा आहे जो मला जगू देत नाही. जर मी मेलो नाही तर तो संपूर्ण कुटुंबाला मारुन टाकेन’. लाल शाईने लिहिलेही ही सुसाइड नोट समोर आल्यांनतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
त्याने स्टॉप धरणात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सागर जिल्ह्यातील रहली येथे घडली. दोन दिवसांपासून सोमेश पांडे हा गायब होता. त्यानंतर आता दोन दिवसांनी त्याचा मृतदेह हा सुनार नदीजवळील गौघाट स्थित धरणात आढळला.
गिरीश पांडे यांचा 17 वर्षांचा मुलगा सोमेश पांडे हा सायंकाळी 4 वाजता मंदिराचे नाव सांगून घरातून निघाला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. जेव्हा सोमेश मिळून आला नाही तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. बुधवारी पोलीस आणि कुटुंबीय सोमेशचा शोध घेत असताना त्यांना मादरा पुलाखाली सोमेशची दुचाकी आढळून आली. यानंतर त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली. मात्र, तरीही काहीही सापडले नाही.
advertisement
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स, राजकारणात एक ग्लॅमरस महिलेची एंट्री, कोण ही महिला?
यानंतर सायंकाळी स्टॉप धरणाजवळील पाण्यात एक मृतदेह लोकांना दिसला. कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बेपत्ता सोमेशचा असल्याची ओळख पटवली. सोमेशच्या खिशात सुसाईड नोट, दुचाकीची चावी आणि मोबाईल सापडला. यावेळी मुलाची सुसाईड नोट वाचून पालकांनाही धक्का बसला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. तर ऑनलाइन मोबाईल गेममध्ये काही टास्क पूर्ण करण्यासाठी सोमेशने हे पाऊल उचलले असल्याची भीती व्यक्त होत आहे. रहली येथील अधिकारी प्रकाश मिश्रा यांनी माहिती देताना सांगितले की, नदीत 17 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. त्याचा पंचनामा करण्यात आला असून एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्या आधारावर पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मंदिरात जातो असे सांगून 17 वर्षांच्या मुलाची आत्महत्या, मुलगी किंवा पैशांसाठी नव्हे तर..., सुसाइड नोटमध्ये हादरवणारी माहिती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement