TRENDING:

Business Idea: अवघ्या 2 रुपयांत खरेदी करा अन् 10 रुपयांना विका, लगेच करा बक्कळ कमाईचा श्रीगणेशा!

Last Updated:

Business Idea: यंदाच्या गणेशोत्सवापासून फायद्याच्या बिझनेसचा श्रीगणेशा करू शकता. मुंबईत फक्त 2 रुपयांपासून आकर्षक बॅग मिळत आहेत.

advertisement
मुंबई: गणेशोत्सवासाठी घरोघरी तयारी सुरू असून सजावटीसाठीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांत गर्दी होतेय. मुंबईतील भुलेश्वर मार्केट हे नेहमीच होलसेल खरेदीसाठी ओळखले जाते. सध्या विविध सण-उत्सवांचा हंगाम सुरू असून कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण इथे फक्त दोन रुपयांपासून विविध प्रकारच्या बॅग्स उपलब्ध आहेत. कबूतरखान्याजवळ असलेल्या उत्तम कव्हर्स या दुकानात या बॅग्स मिळतात. छोट्या गिफ्ट बॅगपासून ते एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या खास बॅग्सपर्यंत सर्व काही होलसेल दरात उपलब्ध आहे.
advertisement

उपलब्ध बॅग्स आणि किमती

मुंबईतील भुलेश्वर मार्केटमध्ये छोट्या गिफ्ट बॅग फक्त 2 रुपयांपासून मिळतात. वेगवेगळ्या रंगात एम्ब्रॉयडरी असणाऱ्या छोट्या पर्स 20 रुपये, तर पैठणी बॅग (8 बाय 10 साईज) 50 रुपये, टिफिन बॅग – 20 ते 40 रुपये (वॉटरप्रूफ देखील उपलब्ध) खनाची बॅग 35 रुपयांत उपलब्ध आहेत.या बॅगची साईजनुसार किंमत बदलते. बँगल पर्स 50 रुपये, एम्ब्रॉयडरी वर्क बॅग 150 रुपयांपासून तर वॉटरप्रूफ बॅग्स 50 ते 70 रुपयांत मिळतात.

advertisement

4 वर्षांपूर्वी केली सुरूवात, वडापाव विक्रीतून तरुण कमवतोय महिन्याला 2 लाख, सांगितला सक्सेस मंत्रा

बनारसी बॅग (12x12 साईज, दोन्ही बाजू प्रिंट) 105 रुपये, एम्ब्रॉयडरी बँगल्स बॅग (6 इंच बॉक्स साईज) 60 रुपये, बटवा 30 रुपये आणि गिफ्टिंग मटका बॅग 40 रुपयांत उपलब्ध आहेत. सर्व बॅग्स होलसेल दरात मिळतात. मात्र, येथे खरेदीसाठी किमान एक पॅकेट (12 बॅग्स) घेणे आवश्यक आहे.

advertisement

व्यवसायासाठी उत्तम संधी

जर तुम्ही होलसेलमध्ये खरेदी करून रिटेल विक्री करण्याचा विचार करत असाल, तर भुलेश्वर मार्केटमधील ही ठिकाणे तुम्हाला कमी गुंतवणुकीत भरघोस नफा देऊ शकतात. विशेषतः सण-उत्सव, लग्नसमारंभ आणि गिफ्टिंगसाठी या बॅग्सची मागणी मोठी आहे.

मराठी बातम्या/मनी/
Business Idea: अवघ्या 2 रुपयांत खरेदी करा अन् 10 रुपयांना विका, लगेच करा बक्कळ कमाईचा श्रीगणेशा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल