नव्या दरांनुसार एक लिटर टेट्रा पॅक दुधावर 5 टक्के GST सह 77 रुपये दर होते. आता 75 रुपयांना दूध मिळणार आहे. तूप 750 रुपये होतं आता ते 720 रुपयांना मिळणार आहे. जे 200 ग्रॅम पनीर 95 रुपयांना मिळत होतं ते आता 92 रुपयांना मिळणार आहे. चीज स्लाइस 200 ग्रॅम जे 170 रुपयांना मिळणार होतं ते आता 160 रुपयांना नव्या दरांनुसार मिळणार आहे.
advertisement
रोजच्या वापरातील साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, केसांचे तेल 99 टक्के वस्तू 12 टक्के जीएसटी स्लॅबमधून 5 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये हलवल्या जात आहेत. तुम्हाला माहिती आहे की जीएसटी कौन्सिलने जीएसटी प्रणालीतून 12 टक्के आणि 28 टक्के कर स्लॅब काढून टाकले आहेत. यापूर्वी, जीएसटी प्रणालीमध्ये एकूण 4 स्लॅब होते. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के. 22 सप्टेंबरपासून, फक्त 2 स्लॅब 5 टक्के आणि 18 टक्के राहतील. याशिवाय, लक्झरी आणि सिन प्रोडक्ट्सवर 40 टक्के जीएसटीचा नवीन स्लॅब लागू केला जाईल अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.