उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा शहराच्या दनकौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऊंची दनकौर गावातील 20 वर्षांचा दीपक अचानक चर्चेत आला आहे. कारण, त्याच्या बँक खात्यात रातोरात 1,13,55,00,00,000 रुपये जमा झाल्याचं त्याच्या मोबाईलवर दिसलं आणि त्याची झोपच उडाली. ही रक्कम पाहून दीपक आणि त्याचा संपूर्ण कुटुंब पूर्णपणे चक्रावून गेला. इतकी प्रचंड रक्कम मोबाईलवर पाहून दीपक काही क्षणांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनला. मात्र हे सुख फार काळ टिकलं नाही.
advertisement
आयकर विभागाने त्यांचं अकाउंट सील केलं आहे. ही माहिती समोर येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. बँक आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासात लक्षात आले की, ही रक्कम प्रत्यक्षात बँकेच्या सिस्टममध्ये कुठेही नोंदलेली नाही. मात्र दीपकच्या मोबाइल अॅपमध्ये ती रक्कम अजूनही दिसत होती. त्यामुळे हे कुठलेतरी तांत्रिक बिघाड आहे की मोठ्या सायबर फसवणुकीचा भाग, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दीपकचे बँक खाते तातडीने सील करण्यात आलं. आयकर विभागाचे अधिकारी आणि पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. ही रक्कम कशी आली, कुठून ट्रान्सफर झाली आणि यामागे कोण आहे. याचा तपास सुरू आहे. हा प्रकार समोर येताच सोशल मीडियावरही खळबळ उडाली आहे. अनेक जण दीपकला ‘रिअल लाईफ अरबपती’ म्हणत मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. इतकी मोठी रक्कम कोणत्याही छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे आणि त्यामुळे प्रशासनही अधिक सतर्क झालं आहे.