लिस्टिंगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये या आयपीओला जोरदार मागणी असल्याचं दिसलं. हा इश्यू अनलिस्टेड मार्केटमध्ये 340 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लिस्टिंगवेळी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 340 रुपयांचा नफा होऊ शकतो.
(Bajaj Housing Finance IPO धमाका करण्याच्या तयारी, तुम्हाला लागला का? असं चेक करा!)
ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ 340 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. या हिशोबानुसार कंपनीच्या शेअरचं लिस्टिंग 820 रुपये या भावाने होऊ शकतं. असं झालं तर गुंतवणूकदारांना 71 टक्के नफा होऊ शकतो. ग्रे मार्केट हे एक अनधिकृत मार्केट आहे. या ठिकाणी कोणत्याही कंपनीचा शेअर त्याच्या लिस्टिंगपर्यंत ट्रेड करता येतो. ग्रे मार्केटमधली स्थिती सातत्याने बदलत असते.
advertisement
पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे शेअर केव्हा लिस्ट होणार?
पी. एन.गाडगीळ ज्वेलर्सचे शेअर्स 17 सप्टेंबर रोजी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.
पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओविषयी...
कंपनीच्या आयपीओ अंतर्गत 850 कोटी रुपयांचे 1.77 कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले आहेत. या आयपीओमध्ये अर्जासाठी किमान लॉट आकार 31 शेअर्सचा होता. रिटेल गुंतवणूकदारांना यात किमान 14,880 रुपये गुंतवावे लागतील. ओएफएसची रक्कम शेअर विक्री करणाऱ्या शेअर होल्डर्सना मिळेल. फ्रेश शेअर्सच्या माध्यमातून जमा केलेल्या रकमेपैकी 387 कोटी रुपयांतून महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स सुरू केली जातील आणि 300 कोटी रुपयांतून कर्ज परतफेड केली जाईल. उर्वरित रकमेचा वापर सामान्य कॉर्पोरेट उद्देशासाठी केला जाईल. ग्रे मार्केटमधली स्थिती सातत्याने बदलत असते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
पीएनजी या ब्रँडनेमने उत्पादनांची विक्री
सौरभ विद्याधर गाडगीळ, राधिका सौरभ गाडगीळ आणि एसव्हीजी बिझनेस ट्रस्ट हे कंपनीचे प्रमोटर आहेत. कंपनीने इश्यू खुला करण्यापूर्वी अँकर इन्व्हेस्टर्सकडून 330 कोटी रुपये जमवले. पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स पीएनजी या ब्रँडनेमअंतर्गत सोनं, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंडच्या दागिन्यांसह महागडे मेटल्स/ ज्वेलरी उत्पादनांची विक्री करतात. पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स आयपीओत 456 ते 480 रुपये प्रति शेअर या दराने 31 शेअर्सच्या लॉट साइजमध्ये बोली लागली होती.
पी. एन.गाडगीळ ज्वेलर्सची आर्थिक स्थिती
2024 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 34 टक्क्यांनी वाढून 6119.1 कोटी रुपयांवर पोहोचला. एक वर्षापूर्वी हा महसूल 4559.31 कोटी रुपये होता. 65 टक्क्यांच्या वाढीसह निव्वळ नफा 154.34 कोटी रुपये झाला. तो गेल्या आर्थिक वर्षात 93.7 कोटी रुपये होता.
