या योजनेअंतर्गत 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकदाराला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
PF अकाउंटमधून पैसे काढताना करु नका या 5 चुका, अन्यथा रिजेक्ट होईल अर्ज
योगदान कमी, फायदा जास्त
तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर दरमहा केवळ 210 रुपये योगदान देऊन, तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.
advertisement
सरकारी हमी
या योजनेत मिळणाऱ्या पेन्शनच्या किमान रकमेची हमी केंद्र सरकारकडून दिली जाते, ज्यामुळे तुमचे पेन्शन सुरक्षित राहते.
लेकींचं आयुष्य सेट करायचंय? या योजनेत गुंतवा पैसे, शिक्षण-लग्न सर्वच काम होतील
सरकारी योगदान
केंद्र सरकार देखील तुमच्या योगदानाच्या रकमेच्या 50% किंवा जास्तीत जास्त 1,000 रुपये प्रति वर्ष योगदान देते. पण याची अट आहे की, तुम्ही इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट नसावे आणि तुम्ही आयकरदाता नसावे.
विविध पर्याय
तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करायची असल्यास, तुम्हाला 60 वर्षांच्या वयानंतर 5,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 1,454 रुपये योगदान द्यावे लागेल. तुम्ही वयाच्या 32 व्या वर्षी या योजनेत सामील झाल्यास, तुम्हाला दरमहा 689 रुपये योगदान द्यावे लागेल.
लवचिकता आणि सुरक्षितता
योजनेमध्ये विविध पेन्शन ऑप्शन दिलेले आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गरजा आणि आर्थिक परिस्थितीनुसार योजना निवडू शकता.
अटल पेन्शन योजनेत गुंतवणुकीचे फायदे
-नियमित मासिक पेन्शनद्वारे वृद्धापकाळात आर्थिक निर्भरता टाळणे.
-विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी फायदेशीर.
-लवकर गुंतवणूक केल्यास कमी योगदानासह अधिक फायदे मिळू शकतात.