advertisement

PF अकाउंटमधून पैसे काढताना करु नका या 5 चुका, अन्यथा रिजेक्ट होईल अर्ज

Last Updated:

पीएफ अकाउंटधारक उपचार, शिक्षण किंवा कुटुंबाशी संबंधित कोणत्याही इमरजेन्सी परिस्थितीसाठी EPFO ​​अकाउंटमधून पैसे काढू शकतात. नुकत्याच झालेल्या बदलानंतर, पीएफ अकाउंटधारक आता 50 हजार रुपयांऐवजी 1 लाख रुपये काढू शकतात.

ईपीएफओ
ईपीएफओ
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे चालवल्या जाणाऱ्या EPF योजनेअंतर्गत म्हणजेच EPFO मध्ये खाजगी क्षेत्रातील कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात निधी जमा करू शकतात. या निधीचा लाभ निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात उपलब्ध आहे. ही रक्कम तुम्ही निवृत्तीनंतर काढू शकता. तसंच, EPFO ​​आणीबाणीच्या काळातही पैसे काढण्याची परवानगी देते.
पीएफ अकाउंटधारक उपचार, शिक्षण किंवा कुटुंबाशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी EPFO ​​अकाउंटमधून पैसे काढू शकतात. नुकत्याच झालेल्या बदलानंतर, पीएफ अकाउंट होल्डर्स आता 50 हजार रुपयांऐवजी 1 लाख रुपये काढू शकतात.
PF खात्यातून पैसे काढताना या 5 चुका करू नका
- चेकबुक किंवा पास बुकमध्ये नावात चूक
advertisement
- KYC मध्ये दिलेल्या माहितीतील फरक
- UAN आधारशी लिंक नाही
- बँक अकाउंट नंबर 11 अंकी असणे आवश्यक आहे
- PDF ओपन न होणे
पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला EPFO ​​सदस्यांच्या ई-सेवा पोर्टलवर जावे लागेल.
advertisement
- आता येथे मेंबर विभागात जा.
- त्यानंतर UAN, पासवर्ड आणि कॅप्चा वापरून लॉग इन करा.
- आता ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ टॅबवर जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘क्लेम (फॉर्म-31, 19, 10 सी आणि 10 डी)’ निवडा.
- आपले पर्सनल डिटेल्स जसे की नाव, जन्मतारीख इत्यादी यात टाका.
- यानंतर, आंशिक पैसे काढण्यासाठी फॉर्म 31 निवडा आणि यादीतून पैसे काढण्याचे कारण नमूद करा.
advertisement
- सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP मिळेल.
यानंतर OTP टाका.
- तुम्ही ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ टॅबमधील ‘ट्रॅक क्लेम स्टेटस’ ऑप्शन अंतर्गत क्लेम स्टेटस चेक करु शकता.
view comments
मराठी बातम्या/मनी/
PF अकाउंटमधून पैसे काढताना करु नका या 5 चुका, अन्यथा रिजेक्ट होईल अर्ज
Next Article
advertisement
Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement