Share Market मध्ये गेम फिरला, फक्त 2 सेक्टरमध्ये लोकांनी कमावले, 28 तारखेला काय होईल?
- Published by:sachin Salve
Last Updated:
सुरुवातीच्या चढ-उतारांनंतर दोन्ही निर्देशांक लाल रंगात गेले आणि किरकोळ चढ-उतारांनंतर दिवसाच्या अखेरीला घसरणीसह बंद झाले.
मुंबई: जागतिक बाजारपेठेशी मिळतेजुळते कल असताना आज देशांतर्गत स्टॉक मार्केट्सना फार्मा आणि मेटल क्षेत्रातल्या शेअर्सकडून मोठा सपोर्ट मिळाला. अन्य क्षेत्रांकडून चांगला सपोर्ट न मिळाल्याने इक्विटी बेंचमार्क इंडेक्स बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 यांमध्ये दिवसभरात मोठा दबाव दिसला. सुरुवातीच्या चढ-उतारांनंतर दोन्ही निर्देशांक लाल रंगात गेले आणि किरकोळ चढ-उतारांनंतर दिवसाच्या अखेरीला घसरणीसह बंद झाले. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झाल्यास निफ्टी फार्मा एक टक्क्यापेक्षा अधिक आणि निफ्टी मेटलदेखील एक टक्क्यापेक्षा थोड्याशाच कमी वाढीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनीही मार्केट सांभाळण्याचा प्रयत्न केला. एकंदर बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 29.1 हजार कोटी रुपयांनी वाढलं. म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती तेवढी वाढली.
इक्विटी बेंचमार्क इंडेक्सबद्दल बोलायचं झालं, तर बीएसई सेन्सेक्स आज 230.05 अंक म्हणजेच 0.28 टक्के घसरणीसह 81,381.36वर बंद झाला. निफ्टी 50 हा निर्देशांक 34.20 अंक म्हणजेच 0.14 टक्के घसरणीसह 24,964.25 अंकांवर बंद झाला. इंट्रा-डेमध्ये सेन्सेक्स 81,304.15 आणि निफ्टी 24,920.05पर्यंत घसरला होता.
काल, 10 ऑक्टोबर रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप 4,62,00,104.97 कोटी रुपये होतं. आज, 11 ऑक्टोबर रोजी इक्विटी मार्केटचा व्यवहार बंद होताना हे मार्केट कॅप 4,62,29,260.09 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 29,155.12 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
advertisement
सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्टेड आहेत. त्यांपैकी 16 शेअर्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले आहेत. सर्वाधिक तेजी एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि जेएसडब्ल्यू स्टील या शेअर्समध्ये होती. दुसरीकडे, टीसीएस, एम अँड एम आणि आयसीआयसीआय बँक हे शेअर्स सर्वाधिक तेजीसह बंद झाले.

बीएसईवर आज 4011 शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यांपैकी 2143 शेअर्समध्ये तेजी आली, तर 1751 शेअर्समध्ये घसरण झाली. 117 शेअर्समध्ये काहीही बदल झाला नाही. याव्यतिरिक्त 222 शेअर्सनी एका वर्षातली सर्वोच्च पातळी गाठली, तर 26 शेअर्सनी वर्षभरातली नीचांकी पातळी गाठली. 6 शेअर्स अपर सर्किटला पोहोचले, तर 2 शेअर्स लोअर सर्किटवर आले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2024 9:18 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market मध्ये गेम फिरला, फक्त 2 सेक्टरमध्ये लोकांनी कमावले, 28 तारखेला काय होईल?