पीएफ अकाउंटधारक उपचार, शिक्षण किंवा कुटुंबाशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी EPFO अकाउंटमधून पैसे काढू शकतात. नुकत्याच झालेल्या बदलानंतर, पीएफ अकाउंट होल्डर्स आता 50 हजार रुपयांऐवजी 1 लाख रुपये काढू शकतात.
लेकींचं आयुष्य सेट करायचंय? या योजनेत गुंतवा पैसे, शिक्षण-लग्न सर्वच काम होतील
PF खात्यातून पैसे काढताना या 5 चुका करू नका
advertisement
- चेकबुक किंवा पास बुकमध्ये नावात चूक
- KYC मध्ये दिलेल्या माहितीतील फरक
- UAN आधारशी लिंक नाही
- बँक अकाउंट नंबर 11 अंकी असणे आवश्यक आहे
- PDF ओपन न होणे
Share Market मध्ये गेम फिरला, फक्त 2 सेक्टरमध्ये लोकांनी कमावले, 28 तारखेला काय होईल?
पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला EPFO सदस्यांच्या ई-सेवा पोर्टलवर जावे लागेल.
- आता येथे मेंबर विभागात जा.
- त्यानंतर UAN, पासवर्ड आणि कॅप्चा वापरून लॉग इन करा.
- आता ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ टॅबवर जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘क्लेम (फॉर्म-31, 19, 10 सी आणि 10 डी)’ निवडा.
- आपले पर्सनल डिटेल्स जसे की नाव, जन्मतारीख इत्यादी यात टाका.
- यानंतर, आंशिक पैसे काढण्यासाठी फॉर्म 31 निवडा आणि यादीतून पैसे काढण्याचे कारण नमूद करा.
- सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP मिळेल.
यानंतर OTP टाका.
- तुम्ही ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ टॅबमधील ‘ट्रॅक क्लेम स्टेटस’ ऑप्शन अंतर्गत क्लेम स्टेटस चेक करु शकता.