अकाउंट उघडण्यासाठी लागतात फक्त 500 रुपये
तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्ज अकाउंट उघडत असाल तर त्यात मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो, नाहीतर दंड भरावा लागतो. बँकांमधील रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंटमधील मिनिमम बॅलन्स लिमिट 1000 रुपये असते, परंतु पोस्ट ऑफिसमध्ये किमान 500 रुपयांमध्ये अकाउंट उघडले जाते व मिनिमम बॅलन्स लिमिटही एवढीच आहे.
advertisement
बँकांसारख्या सुविधा
पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंट उघडल्यावर तुम्हाला चेकबुक, एटीएम कार्ड, ई-बँकिंग/मोबाइल बँकिंग, आधार लिंकिंग या सुविधा मिळतात. तसेच तुम्ही या अकाउंटवर अटल पेन्शन योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे लाभ घेऊ शकता. आयकर कायद्याच्या कलम 80TTA अंतर्गत, सर्व बचत बँक खात्यांमधून आर्थिक वर्षात कमवलेल्या 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर करपात्र उत्पन्नातून सूट दिली जाते.
मिळतं बँकांपेक्षा जास्त व्याज
सेव्हिंग्ज अकाउंटमधील जमा रकमेवर बँका वेळोवेळी व्याज देतात, पण ते व्याज 2.70% ते 3.5% आसपास असतं. पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यापेक्षा खूप जास्त व्याज मिळतं.
पोस्ट ऑफिसच्या रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंटवर मिळणारे व्याज
पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटवर व्याज: 4.0%
SBI सेव्हिंग्ज अकाउंटवर व्याज: 2.70%
PNB सेव्हिंग्ज अकाउंटवर व्याज: 2.70%
BOI सेव्हिंग्ज अकाउंटवर व्याज: 2.90%
HDFC सेव्हिंग्ज अकाउंटवर व्याज: 3.00% ते 3.50% पर्यंत
ICICI सेव्हिंग्ज अकाउंटवर व्याज: 3.00% ते 3.50% पर्यंत
कोण उघडू शकतं अकाउंट
पोस्ट ऑफिसमध्ये कुणीही प्रौढ व्यक्ती अकाउंट उघडू शकते. तसेच जॉइंट अकाउंटही उघडता येते. यासाठी आई-बाबा किंवा कायदेशीर पालक मुलांचे अकाउंट उघडू शकतात. 10 वर्षापेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन त्यांच्या नावाने अकाउंट उघडू शकतात. सज्ञान झाल्यावर अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी व नवीन अकाउंटचा फॉर्म व केवायसी डॉक्युमेंट जमा करावे लागतात.
कोणत्या सेवांसाठी चार्जेस लागतात?
आर्थिक वर्ष संपताना पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये 500 रुपयांपेक्षा कमी पैसे असतील तर 50 रुपये मेंटनन्स फी द्यावी लागते.
डुप्लिकेट पासबुकसाठी 50 रुपये द्यावे लागतात.
अकाउंट स्टेटमेंट किंवा डिपॉझिट रिसीटसाठी 20-20 रुपये द्यावे लागतात.
अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी व अकाउंट प्लेज करण्यासाठी 100-100 रुपये लागतात.
नॉमिनीचे नाव बदलण्यासाठी किंवा काढण्यासाठी 50 रुपये लागतात.
तुम्ही एक वर्ष चेक बुकचे 10 लीफ मोफत वापरू शकता, नंतर प्रत्येक लीफसाठी दोन रुपये चार्जेस लागतात.