प्रीती यांनी आपले शिक्षण इंटिरियर डिझायनिंग यामधून पूर्ण केले त्यानंतर ते मुंबईला मोठ्या कंपनीत कामाला होत्या. परंतु कोरोना काळात कंपनीने त्यांना नोकरीवरून काही दिवस थांबण्याचे सांगितले. त्या पाठोपाठ त्यांच्या पतीचे देखील काम थांबले. त्या काळात या दोघांनी नाशिकला येण्याचे ठरविले. कोरोनानंतर पुन्हा आपण सुरुवात करू या विचाराने त्यांनी मोहिनी राज एंटरप्राइज या नावाने कंपनी सुरू केली.
advertisement
या कंपनीत ते सुरुवातीला रिफ्लेक्शन दिवे बनवीत असतं. परंतु काही काळानंतर या व्यवसायाला देखील चालना मिळत नसल्याने त्यांनी, प्लास्टिक रांगोळी बनवून विक्री करण्याचे ठरविले. त्यानंतर स्वतः डिझायनर असल्याने त्यांनी तब्बल 60 पेक्षा अधिक स्वतःचे डिझाइन यात बनवले.
आज त्या संपूर्ण महाराष्ट्रात आपली ही रांगोळी विक्री करत असतात. त्याच बरोबर त्या आपल्या या रांगोळीच्या साच्यांच्या माध्यमातून इतरांना देखील रोजगार पुरवत आहेत. यांच्याकडे हे रांगोळीचे साचे फक्त 10 रुपयांपासून मिळतात.
तुम्ही यांच्याकडून या वस्तू घेऊन स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकणार आहात. याकरिता त्यांनी मोहिनी राज रांगोळी या नावाने इन्स्टाग्राम पेज देखील सुरू केले आहे. तसेच फेसबुकवर देखील तुम्ही यांच्या या रांगोळ्यांचे डिझाइन बनून ऑर्डर करू शकणार आहात.
आज प्रीती या त्यांच्या व्यवसायातून महिन्याला 1 ते 2 लाखांचे उत्पन्न देखील घेत आहेत. तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकणार असल्याने प्रीती यांनी सांगितले आहे.