संस्थेच्या संस्थापिका आशा इंगळे यांनी सांगितलं की, यावर्षी दिवाळीत महिलांनी स्वतःच्या हातांनी आकर्षक आकाशकंदील तयार केले होते, ज्यांची विक्री राज्यभर करण्यात आली. आशा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी सुमारे 60 ते 70 प्रकारचे आकाशकंदील बनवले होते. या कंदिलांची किंमत 20 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंत होती.
Success Story: अश्विनी धुप्पेचा प्रेरणादायी प्रवास! महिलांसाठी ठरली “प्रेरणेचा स्त्रोत”
advertisement
यंदा निवडणुका जवळ आल्याने अनेक राजकीय पक्षांकडून ऑर्डर्स मिळाल्या आणि त्यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली. या उपक्रमातून महिलांनी तब्बल 17 ते 18 लाखांची कमाई केली आहे. संस्थेमार्फत महिलांना फक्त दिवाळीतच नव्हे तर वर्षभर रोजगाराची संधी मिळते. लग्नातील रुकवत, घरगुती वापराच्या वस्तू, सजावटीचे सामान अशा विविध वस्तूही या महिला तयार करतात.
आशा इंगळे सांगतात की, भरारी महिला संस्थेचा उद्देश महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देत त्यांना आत्मनिर्भर बनवणं आहे. काळेवाडी परिसरातील या संस्थेने गेल्या काही वर्षांत शेकडो महिलांना रोजगार दिला असून, त्यांच्या हातून तयार झालेल्या वस्तूंना संपूर्ण महाराष्ट्रभरातून मागणी आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असून त्या आत्मनिर्भर बनत आहेत.