Success Story: अश्विनी धुप्पेचा प्रेरणादायी प्रवास! महिलांसाठी ठरली “प्रेरणेचा स्त्रोत”
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
एक स्त्री सर्व काहीही साध्य करू शकते. तिला कुटुंबाची साथ आणि नवऱ्याचा विश्वास या दोन बाजू भक्कम असतील तर स्त्री आपले स्वप्न समाजामधील आपली ओळख बनवू हे आपण अश्विनी धूप्पे यांच्या यशाच्या शिखरावरून समजू शकतो.
एक स्त्री सर्व काहीही साध्य करू शकते. तिला कुटुंबाची साथ आणि नवऱ्याचा विश्वास या दोन बाजू भक्कम असतील तर स्त्री आपले स्वप्न समाजामधील आपली ओळख बनवू हे आपण अश्विनी धूप्पे यांच्या यशाच्या शिखरावरून समजू शकतो स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक भूमिकांमधून ती कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते. तिच्या प्रेमळ आणि सहनशील स्वभावामुळे घराला 'घरपण' येते.
कणा नाही, तर ती जगायला शिकवणारी आणि संस्कृतीचा स्रोतही आहे. तिच्यामध्ये असलेली वात्सल्य, प्रेम आणि सेवाभाव या गुणांमुळे ती कुटुंबाला आणि समाजाला योग्य दिशा देते. स्त्री ही समाजाचा अविभाज्य भाग आहे. तिची ओळख , तिच्या कार्यावर, तिच्या धैर्यावर आणि तिच्या योगदानावर अवलंबून आहे. आपल्याला स्त्रीचा आदर केला पाहिजे आणि तिला समाजात योग्य स्थान दिले पाहिजे, जेणेकरून ती अधिक सक्षमपणे योगदान देऊ शकेल. काळात स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. शिक्षण, नोकरी, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्री आघाडीवर आहे. तरीही, तिला अजूनही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, जसे की सुरक्षिततेच्या समस्या आणि अत्याचारांना बळी पडणे.
advertisement
त्यामुळे स्त्रियांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणे महत्त्वाचे आहे. त्याचेच एक जिवंत उदाहर. म्हणजे अश्विनी धूप्पे ..बोलतात ना स्वप्न मोठी बघावी. ती कालांतराने पूर्ण होतात.त्यातल्याच एक धूप्पे अतिशय ग्रामीण भागात जन्मलेल्या अश्विनी धुप्पे डोळ्यात मोठी स्वप्न... पण हातात साधनं नव्हती. गावात ना चांगली शाळा, ना मार्गदर्शन तरीसुद्धा अश्विनी यांनी हार मानली नाही. स्वतःच्या जिद्दीवर, कठोर परिश्रमाने त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.आज त्या फक्त स्वतःच नाही, तर अनेक तरुण आणि महिलांसाठी “प्रेरणेचा स्त्रोत” ठरल्या आहेत. शिक्षण, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर अश्विनी यांनी ग्रामीण भागातील शेकडो मुलं आणि महिलांचं भविष्य उजळवलं आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Oct 31, 2025 9:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Success Story: अश्विनी धुप्पेचा प्रेरणादायी प्रवास! महिलांसाठी ठरली “प्रेरणेचा स्त्रोत”









