TRENDING:

TCSच्या कर्मचाऱ्याची Salary Slip व्हायरल, 25 हजारांवरून पगार इतका झाला स्लिप पाहून HR घाबरतोय; कोणाचा विश्वास बसेना

Last Updated:

TCS Employee: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)मध्ये गेल्या पाच वर्षांपासून काम करणाऱ्या जावा डेव्हलपरची पोस्ट सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या कर्मचाऱ्याचा पगार पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: टाटा समूहातील आघडीच्या कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) नेहमी घेतले जाते. गेल्या काही महिन्यात TCSची चर्चा नोकर कपातीवरून जास्त झाली. आता कंपनीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या वेळाचे कारण TCSच्या एका कर्मचाऱ्याने केलेल्या पोस्टचे ठरले आहे.

advertisement

रेडिटवर एका आयटी व्यावसायिकाने शेअर केलेली एक अनपेक्षित आणि अस्वस्थ करणारी कथा सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरत आहे. स्वतःला जावा डेव्हलपर म्हणून ओळख देणाऱ्या या युजरने दावा केला आहे की, भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ काम करूनही त्याचा पगार वाढण्याऐवजी कमी झाला आहे.

advertisement

r/developersIndia या लोकप्रिय रेडिट फोरमवर केलेल्या सविस्तर पोस्टमध्ये या कर्मचाऱ्याने आपला संपूर्ण प्रवास मांडला आहे. त्यानुसार तो 2020 साली TCS मध्ये रुजू झाला, तेव्हा त्याचा मासिक पगार 25 हजार रुपये इतका होता. मात्र 2026 मध्ये म्हणजे साडेपाच वर्षांच्या सेवेनंतर, त्याचा हातात येणारा मासिक पगार केवळ 22,800 रुपये इतकाच राहिला आहे, असे त्याने नमूद केले आहे.

advertisement

या पोस्टमध्ये संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या करिअरमधील काही महत्त्वाच्या चुका आणि निर्णयही प्रामाणिकपणे मांडले आहेत. एका टियर-3 कॉलेजमधून पदवीधर झाला आणि TCS मध्ये रुजू झाल्यानंतर त्याने आयटी क्षेत्रातील कौशल्ये वाढवण्याऐवजी सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले. याचा थेट परिणाम त्याच्या कामगिरीवर झाला. कंपनीत त्याला सातत्याने C ते D असे कमी परफॉर्मन्स बँड्स मिळत राहिले.

advertisement

जुलै 2025 मध्ये त्याला Performance Improvement Plan (PIP) वर ठेवण्यात आले. या टप्प्यावर त्याने अधिक मेहनत घेतली आणि विशेष बाब म्हणजे, PIP सुरू असतानाच त्याने आपल्या मॅनेजरला न सांगता दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये स्वतःला अ‍ॅसाईन करून घेतले. परिणामी PIP चा कालावधी संपला आणि त्याची नोकरी वाचली, मात्र त्याचे वार्षिक appraisal थांबवण्यात आले, ज्याचा परिणाम थेट पगारावर झाला.

जानेवारी 2026 मध्ये या कर्मचाऱ्याने अखेर गंभीरपणे Java Backend Developer म्हणून स्वतःचे upskilling केले. मात्र इथेच त्याच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले. तो जेव्हा बाहेरच्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखती देतो, तेव्हा मुलाखत यशस्वी होत असली तरी HR विभाग त्याचे सध्याचे पगार स्लिप्स पाहून संशय व्यक्त करतो आणि पुढील ऑफर चर्चाच थांबवतो, असा त्याचा दावा आहे. अखेरीस, आयटी क्षेत्रात टिकून राहण्यासाठी मी नेमकं काय करावं? असा हताश प्रश्न विचारत त्याने आपली पोस्ट संपवली आहे.

या पोस्टची रेडिटवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी त्याला व्यावहारिक सल्ले दिले आहेत. एका युजरने सुचवले की, मोठ्या कंपन्यांऐवजी सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्समध्ये कमी पगारावर का होईना, पण संधी घ्यावी. “स्टार्टअप्समध्ये एका वर्षात तीन वर्षांचे कौशल्य शिकायला मिळते. दर एक-दोन वर्षांनी कंपनी बदला आणि अनुभव वाढवा,” असा सल्ला त्याने दिला.

दुसऱ्या युजरने वेगळाच दृष्टिकोन मांडत MBA हा पर्याय सुचवला. “पाच वर्षांच्या अनुभवानंतरही 22 हजार पगार असणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. टेक्निकल कौशल्ये कमी वेळात भरून काढणं अवघड आहे, त्यामुळे MBA करून करिअरला नवी दिशा देणं योग्य ठरेल,” असे त्याचे मत होते.

तिसऱ्या युजरने मानसिकतेवर भर दिला. “तुझं लक्ष कधी आयटीकडे, कधी सरकारी नोकरीकडे असं विभागलं गेलं. आता एकदा कौशल्य सिद्ध केलंस, तर HR समोर प्रामाणिकपणे सांगता येईल की एकदा लक्ष दिलं की तू उत्तम काम करू शकतोस. हीच तुझी स्टोरी असू शकते,” असा सल्ला त्याने दिला.

ही स्टोरी जरी एका व्यक्तीच्या अनुभवावर आधारित असली, तरी यामुळे आयटी क्षेत्रातील करिअर ग्रोथ, परफॉर्मन्स मॅनेजमेंट आणि पगारवाढीच्या वास्तवावर गंभीर चर्चा सुरू केली आहे. करिअरच्या सुरुवातीला घेतलेले निर्णय, कौशल्यांवर दिलेले लक्ष आणि परफॉर्मन्स रेकॉर्ड यांचा दीर्घकालीन परिणाम किती खोलवर होऊ शकतो, हे या उदाहरणातून स्पष्ट होते.

टीप: वरील सर्व माहिती ही संबंधित युजरने रेडिटवर शेअर केलेल्या तपशीलांवर आधारित आहे. कंपनीची किंवा इतर कोणत्याही अधिकृत स्रोतांची याबाबत पुष्टी उपलब्ध नाही.

मराठी बातम्या/मनी/
TCSच्या कर्मचाऱ्याची Salary Slip व्हायरल, 25 हजारांवरून पगार इतका झाला स्लिप पाहून HR घाबरतोय; कोणाचा विश्वास बसेना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल