TRENDING:

Share Market: संपूर्ण कुटुंबाचे पैसे बुडाले, 1 हजार 760 कोटींचे नुकसान; गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा

Last Updated:

Tata Motors Stock Fall: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सतत होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. अवघ्या पाच महिन्यांत या शेअरने हजारो कोटींचे नुकसान केले असून, बाजारातील अस्थिरतेने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.

advertisement
मुंबई: मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील घसरणीमुळे अनेकांना मोठा तोटा झाला आहे. फक्त लहान गुंतवणुकदार नाही तर मोठ्या गुंतवणुकदारांचे देखील काही कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये ४० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. यात टाटा ग्रुपमधील टाटा मोटर्सचा देखील समावेश आहे. बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर त्यांचे गुंतवणूक पोर्टफोलिओ त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला सांभाळत आहेत. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या टाटा मोटर्सच्या शेअर्समुळे त्यांना मोठा तोटा झाला आहे.
News18
News18
advertisement

गेल्या पाच महिन्यांत टाटा समूहाच्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने रेखा झुनझुनवाला तोट्याला सामोरे जावे लागले आहे. सोमवारी (3 मार्च 2025) या शेअर्सने 52 आठवड्यांचा नवा नीचांक गाठला होता. ज्यामुळे रेखा झुनझुनवाला यांचे तब्बल 1,760 कोटी रुपये गमावले गेले.

शेअर बाजार पॅनिक, स्वस्तात मिळाले म्हणून 1661 कोटीचे शेअर्स घेतले, बसला तडाखा

advertisement

टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी टाटा मोटर्सचा शेअर 620.65 रुपयांवर उघडला. मात्र काही वेळातच घसरत 606.30 रुपयांवर पोहोचला. या शेअर्सचे हे 52 आठवड्यांतील सर्वात नीचांकी मूल्य ठरले. सततच्या विक्रीच्या दबावामुळे कंपनीचे बाजार भांडवलही 2.29 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे.

30 सप्टेंबर 2024 पर्यंत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचे 4,77,70,260 शेअर्स होते. त्यांची एकूण भागीदारी 1.30% इतकी होती. त्यावेळी या शेअरची किंमत 974.65 रुपये होती. त्यामुळे त्यांची गुंतवणूक 4,655.92 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र 3 मार्च 2025 रोजी ही किंमत 606.30 रुपयांवर घसरल्याने त्यांची गुंतवणूक कमी होऊन 2,895.83 कोटी रुपये झाली. म्हणजेच 1,760 कोटी रुपयांचा तोटा झाला.

advertisement

शेअर बाजाराचा बॅलन्स बिघडला, इतिहासातील सर्वात मोठी घसरण

49% घसरण

30 जुलै 2024 रोजी टाटा मोटर्सचा शेअर 1,179.05 रुपयांवर गेला होता. मात्र त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत आहे आणि आता तो उच्चांकी किमतीच्या तुलनेत 49% घसरला आहे.

लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक

गेल्या काही महिन्यांत घसरण झाली असली तरी, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी टाटा मोटर्स मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. 6 मार्च 2020 रोजी या शेअरची किंमत 114.20 रुपये होती. आतापर्यंत त्याने 444.13% परतावा दिला आहे. म्हणजेच पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे पाच पट वाढले आहेत.

advertisement

शेअर बाजारात अनोखा ट्विस्ट, इन्व्हेस्टर्स गोंधळले, अजून एक धोक्याची घंटा?

यापुढे काय?

टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये सध्या विक्रीचा दबाव असला तरी, भविष्यात कंपनीची कामगिरी सुधारली तर हा शेअर पुन्हा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तज्ञांच्या मते दिर्घकाळासाठी हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो.

मराठी बातम्या/मनी/
Share Market: संपूर्ण कुटुंबाचे पैसे बुडाले, 1 हजार 760 कोटींचे नुकसान; गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल