पीआयबी फॅक्ट चेकने अशा दाव्यांना पूर्णपणे बनवाट असल्याचं सांगितलं आहे. लोकांना या स्कॅमपासून दूर राहण्याचा इशाराही दिला आहे. पीआयबी फॅक्ट चेकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितलं की, काही सायबर ठग हे SBI ग्राहकांना बनावट मेसेज पाठवत आहेत. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, ग्राहकांना आधार अपडेट करण्यासाठी एस APK फाइल डाउनलोड करावी लागेल. अन्यता SBI YONO अॅप बंद केले जाईल. PIB ने स्पष्ट शब्दात म्हटलंय की, एसबीआय कधीही SMS किंवा WhatsApp वर लिंक किंवा APK फाइल पाठवत नाही. अशा प्रकारचे मेसेज हे पूर्णपणे फसवणूक आहे.
advertisement
APK फाइल डाउनलोड करणे का धोकादायक
एखाद्या यूझरने अनोळखी लिंकवर केले किंवा APK फाइल इंस्टॉल केली, तर त्याच्या मोबाईलमध्ये मालवेअर येऊ शकते. यामुळे फसवणूक करणारे तुमचे बँक डिटेल्स, लॉगिन आयडी आणि पासवर्ड, OTP आणि वैय्तिक माहितीपर्यंत पोहोचू शकतात. एकदा फोनचा कंट्रोल फसवणूक करणाऱ्यांच्या हातात गेला तर अकाउंटमधून सर्व पैसे उडण्याचा धोका वाढतो.
SBI ने कोट्यवधी ग्राहकांना केलं सावध! अजिबात करु नका या चुका
संशयास्पद बातमी येथे करा चेक
तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही बातम्यांबद्दल काही शंका असेल, तर तुम्ही त्याची सत्यता पडताळण्यासाठी PIB फॅक्ट चेकची मदत घेऊ शकता. कोणीही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संबंधित URL थेट PIB फॅक्ट चेकला पाठवू शकतो. 8799711259 हा व्हॉट्सअॅप नंबर किंवा factcheck@pib.gov.in हा ईमेल देखील वापरता येतो. PIB फॅक्ट चेक युनिट 2019 पासून अॅक्टिव्ह आहे आणि त्याने हजारो बनावट बातम्यांचे खंडन केले आहे. सरकारी योजना आणि धोरणांशी संबंधित खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीला आळा घालणे हे युनिटचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
