TRENDING:

फक्त 23 रुपयाच्या शेअरने बाजारात घडवला महाचमत्कार, 1 लाखाचे झाले 64.5 लाख; दिग्गज गुंतवणुकदारांना हादरा, आजची किंमत किती?

Last Updated:

Share Market: शेअर बाजारात योग्य वेळी घेतलेला एक शेअर गुंतवणूकदारांचे आयुष्य कसे बदलू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे NPST. अवघ्या अडीच वर्षांत 16,000 टक्क्यांहून अधिक परतावा देत या शेअरने छोट्या गुंतवणूकदारांना प्रचंड श्रीमंत केले आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: शेअर बाजारात योग्य वेळी योग्य शेअर निवडला, तर तो थेट आयुष्य बदलू शकतो. नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज (NPST) त्याचे उदाहरण ठरला आहे. डिजिटल बँकिंग आणि पेमेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीने अवघ्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना प्रचंड श्रीमंत केले आहे.

advertisement

जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2024 या साधारण अडीच वर्षांच्या कालावधीत NPST च्या शेअरने तब्बल 16,270 टक्क्यांची झेप घेतली. या काळात शेअरने 3,577 असा उच्चांकही गाठला. भारतीय शेअर बाजारात एवढ्या कमी काळात इतका मोठा परतावा देणाऱ्या मोजक्या कंपन्यांमध्ये NPSTचा समावेश झाला आहे.

advertisement

1 लाखांची गुंतवणूक झाली 64.5 लाखांची

NPST साठी 2023 हे वर्ष सुवर्णकाळ ठरले. या एका वर्षातच शेअरमध्ये 1,012 टक्क्यांची वाढ झाली. 2022 आणि 2024 मध्येही गुंतवणूकदारांना अनुक्रमे 201 टक्के आणि 226 टक्के परतावा मिळाला. जरी 2025 मध्ये शेअरमध्ये 47 टक्क्यांची घसरण झाली असली, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर अजूनही ‘सोनेरीठरला आहे. अवघ्या चार वर्षांपूर्वी गुंतवलेले 1 लाख आज वाढून सुमारे 64.5 लाख झाले आहेत. या काळात शेअरची किंमत 21.85 वरून थेट 1,400 पर्यंत पोहोचली.

advertisement

छोट्या गुंतवणूकदारांचा मजबूत विश्वास

या यशकथेतील महत्त्वाची बाब म्हणजे छोट्या गुंतवणूकदारांची मोठी भागीदारी. सप्टेंबर तिमाहीच्या आकडेवारीनुसार कंपनीत साधारण 29.7 टक्के हिस्सा सामान्य गुंतवणूकदारांचा आहे.

यामध्ये 2 लाखांपर्यंत गुंतवणूक असलेले सुमारे 26 लाख छोटे गुंतवणूकदार सामील आहेत. या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या वाढीवर विश्वास दाखवला असून 2,917 कोटींच्या मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. बाजारातील चढ-उतार असूनही NPST छोट्या गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचं प्रतीक बनला आहे.

advertisement

इन्फिनिटी इन्फोवे सोबत नवी भागीदारी

भविष्यातील वाढीसाठी NPST ने नुकतीच इन्फिनिटी इन्फोवे या कंपनीसोबत महत्त्वाची भागीदारी जाहीर केली आहे. या अंतर्गत ‘आयडेंटिटी-लिंक्ड डिजिटल पेमेंटसोल्यूशन सुरू करण्यात येणार आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांचे आयडी कार्ड किंवा कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र थेट ‘टाइमपे प्रीपेड कार्ड’ म्हणून वापरता येणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये कॅशलेस, सुरक्षित आणि सोपे व्यवहार करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे कंपनीची तांत्रिक ताकद अधिक मजबूत होत असून भविष्यातील व्यवसायाच्या संधीही वाढताना दिसत आहेत.

कंपनी नेमकी करते तरी काय?

NPST ही कंपनी डिजिटल बँकिंग आणि पेमेंट सोल्यूशन्स क्षेत्रात कार्यरत आहे. मोबाईलवरून पैसे पाठवणे, ऑनलाइन खरेदीसाठी पेमेंट करणे, प्रीपेड कार्ड्स, बँकिंग सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टी डिजिटल बँकिंगचा भाग आहेत. NPST याच क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करते.

जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2024 या काळात शेअरने दिलेली 16,270 टक्क्यांची वाढ ही बाजारात क्वचितच पाहायला मिळते. त्या वेळी केवळ 100 गुंतवले असते, तर ते 16,000 पेक्षा जास्त झाले असते, तर 1 लाखांची गुंतवणूक कोट्यवधींच्या जवळ पोहोचली असती. हीच या शेअरची खरी ताकद मानली जात आहे.

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
फक्त 23 रुपयाच्या शेअरने बाजारात घडवला महाचमत्कार, 1 लाखाचे झाले 64.5 लाख; दिग्गज गुंतवणुकदारांना हादरा, आजची किंमत किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल