शेअर बाजारात झटपट कमाई करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या अनेक कोर्स आणि वेबिनारवर सेबीची नजर बऱ्याच दिवसांपासून होती. मात्र, अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमी आणि तिचे प्रमुख अवधूत साठे यांना पाठवलेली नोटीस सर्वात मोठा झटका दणका मानला जात. SEBI ने केलेल्या चौकशीत, ॲकॅडमी कोर्स आणि लाईव्ह सेशन्सच्या नावाखाली नोंदणीशिवाय गुंतवणुकीचा सल्ला देत होती. त्यामुळे आता SEBI ने सुमारे ६०१ कोटी रुपये आणि त्यावरील व्याजाची वसुली करण्याची कारवाई सुरू केली आहे, तसेच त्यांना शेअर बाजारात प्रवेश करण्यापासून तातडीने रोखले आहे.
advertisement
नोंदणी नसताना दिला जात होता पैसे गुंतवायचा सल्ला
SEB च्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली, अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमी आणि अवधूत साठे हे त्यांच्या लाईव्ह सेशन्समध्ये थेट स्टॉक खरेदी-विक्री करण्याच्या 'लेव्हल्स', 'स्टॉप लॉस', 'टारगेट' आणि मोठ्या नफ्याचे दावे सांगत होते. हे सर्व काम कोणत्याही कायदेशीर परवान्याशिवाय केले जात होते, कारण नियमानुसार हा सल्ला देण्याचा अधिकार केवळ SEBI-नोंदणीकृत सल्लागारांनाच आहे. 'इतका टार्गेट येईल', 'एफडीचे पैसे येथे गुंतवा' अशा प्रकारची भ्रामक विधाने WhatsApp ग्रुप्समध्येही दिली जात होती.
६०१ कोटींहून अधिक वसुलीची तयारी
SEBI ने जारी केलेल्या आदेशानुसार, ॲकॅडमी आणि संबंधित व्यक्तींना शो-कॉज नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना ६०१ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम व्याजासह अवैध मार्गाने कमावलेल्या नफ्याची वसुली म्हणून का वसूल करू नये, याचे उत्तर देण्यास सांगितले आहे.
शेअर बाजारात 'नो एन्ट्री'
SEBI ने केवळ वसुलीची कारवाई सुरू केली नाही, तर तातडीचा इंटरिम ऑर्डर जारी करत अवधूत साठे आणि त्यांच्या ॲकॅडमीला शेअर बाजारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले आहे. म्हणजेच, त्यांना आता शेअर बाजारामध्ये खरेदी-विक्री करणे, डीलिंग करणे किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता गुंतवणूकदारांनाही चांगला धडा मिळला असेल.
