नफ्यात बंपर वाढ
न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार फक्त शेअरची किंमत नाही, तर कंपनीची कमाईसुद्धा जबरदस्त आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या तिमाही निकालांनुसार (Q2 FY26), कंपनीने ७०९ कोटी रुपयांचा महसूल मिळवला, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ८६% ची मोठी वाढ आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या वर्षी याच काळात कंपनीला २ कोटींचा तोटा झाला होता, पण आता त्यांनी तो भरून काढत १७ कोटींचा नफा कमावला आहे. कंपनीचा नफा गेल्या पाच वर्षांत सरासरी ८८% दराने वाढत आहे, हे आकडे सांगतात की, कंपनीचा आर्थिक पाया किती मजबूत आहे.
advertisement
सोप्या सूत्राने मार्केट कॅप्चर
V2 रिटेलचं हे यश फक्त मेट्रो सीटीपुरतं मर्यादीत नाही. २००१ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने टियर-II आणि टियर-III शहरांमध्ये आपले जाळे विणलं. कंपनीचे सूत्र अगदी सोपं, उत्कृष्ट गुणवत्ता परवडणाऱ्या दरात द्या! याच सूत्राच्या बळावर आज कंपनीचे २३ राज्यांमध्ये २५९ हून अधिक स्टोअर्स आहेत. कंपनीच्या या वेगाने होत असलेल्या विस्तारामुळेच तिच्या महसुलाचा आणि पर्यायाने शेअरच्या किमतीचा आलेख चढता राहिला आहे.
ग्राहकांमध्ये विश्वास वाढवला
V2 रिटेलने केवळ दुसऱ्याचे कपडे विकले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या ब्रँडचे कपडेही बनवायला सुरुवात केली. GODSPEED, Herrlich, Glamora यांसारखे त्यांचे स्वतःचे ब्रँड्स बाजारात लोकप्रिय झाले आहेत. आता कंपनी पुढच्या काळात आणखी वेगाने धाव घेण्याच्या तयारीत आहे. आगामी काळात १५० हून अधिक नवीन स्टोअर्स उघडण्याची त्यांची योजना आहे. कंपनीची ही महत्त्वाकांक्षी योजना पाहूनच गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे आणि स्टॉकने कमाल केली आहे.
गुंतवणूकदारांसाठी धडा
V2 रिटेलचा हा प्रवास प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एक धडा आहे. शेअर बाजारात त्वरित पैसा कमावण्याच्या हव्यासापेक्षा, कंपनीच्या आर्थिक बळावर आणि तिच्या भविष्यातील विस्ताराच्या योजनेवर विश्वास ठेवावा लागतो. या स्टॉकमध्ये पाच वर्षांपूर्वी १ लाख गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी केवळ संयम ठेवला, आणि आज त्यांच्या संयमाचे फळ ३५ लाखांच्या रूपात मिळाले आहे. आज गुंतवणूकदारांची चांदी झाली.
डिस्क्लेमर: शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असल्याने त्यात उच्च जोखीम असू शकते. कोणतीही आर्थिक अथवा गुंतवणुकीसंबंधी व्यवहार करण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागारांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. गुंतवणुकीत होणाऱ्या नफा किंवा तोटा याबाबत News18 मराठी कोणतीही जबाबदारी स्विकारत नाही.
