दिल्लीतील सर्वात महागड्या भागांपैकी एक असलेल्या लुटियन्स झोनमध्ये तब्बल 150 कोटींना एका बंगल्याची खरेदी करण्यात आली आहे. दिल्लीतील लुटियन्स झोन हा असा भाग आहे जिथे 500 कोटी रुपयांपर्यंतचे बंगलेही आहेत.
रोहित शर्माचा 20 सेकंदांचा सिक्रेट चॅट व्हिडिओ लीक; आगरकरला म्हणाला...
दिल्लीतील लुटियन्स परिसरातील पृथ्वीराज रोडवरील 150 कोटी रुपयांचा हा भव्य बंगला डीएलएफच्या सिद्धांत रियल इस्टेट कंपनीने खरेदी केला आहे. सिद्धांत रियल इस्टेट ही प्रसिद्ध रियल इस्टेट कंपनी डीएलएफची उपकंपनी आहे. या फर्मने रंगोली रिसॉर्ट्सकडून हा बंगला विकत घेतला आहे. डीएलएफचे चेअरमन राजीव सिंग आहेत.
advertisement
ब्लॅक वॉरंट म्हणजे काय? कधी आणि कोणा विरुद्ध काढले जाते, त्यावर कोण सही करते?
सिद्धांत रियल इस्टेटने या बंगल्यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून 10.5 कोटी रुपये भरले आहेत. रियल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्सद्वारे प्राप्त कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे. ही खरेदी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झाली होती. या बंगल्याचा आकार 1839 चौरस मीटर आहे.
डीएलएफ ही देशातील प्रमुख रियल इस्टेट कंपनी आहे. राजीव सिंग या कंपनीचे चेअरमन आहेत. ग्रोहे-हुरुन रेटिंगनुसार राजीव सिंग हे देशातील सर्वात श्रीमंत रियल इस्टेट उद्योजक आहेत. ते रियल इस्टेट किंग कुशल पाल सिंग यांचे एकमेव वारसदार आहेत. राजीव सिंग यांनी मासाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी घेतली असून, त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीतील पदवी पूर्ण केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कोणाला संधी मिळाली
राजीव सिंग यांना आर्थिक वर्ष 2023-24 साठी 27.30 कोटी रुपयांचे वेतन पॅकेज मिळाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ 38% अधिक होते. डीएलएफच्या वार्षिक अहवालानुसार 2022-23 मध्ये त्यांना 19.77 कोटी रुपये वेतन मिळाले होते.
जुलै 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रोहे-हुरुन रेटिंगनुसार राजीव सिंग देशातील सर्वात श्रीमंत रियल इस्टेट उद्योजक ठरले. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 1.25 लाख कोटी रुपये होती. बीएसईच्या अधिकृत वेबसाइटनुसार, शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर डीएलएफचे मार्केट कॅप सुमारे 1.86 लाख कोटी रुपये होते. इतक्या मोठ्या मार्केट कॅपसह डीएलएफ रियल इस्टेट कंपन्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे.