TRENDING:

Women Success Story: लेकीच्या वाढदिवसासाठी बनवला केक, तेजस्विनीला मिळाली बिझनेस आयडिया, आता महिन्याला 70 हजार कमाई

Last Updated:

Women Success Story: स्वप्न होते मुलीच्या वाढदिवसाचा केक घरीच बनवावा. ते स्वप्न पूर्ण तर झाले, परंतु यासोबत नाशिकच्या तेजस्विनी खैरनार या गृहिणीला एक नवीन व्यवसायदेखील मिळाला आहे.

advertisement
नाशिक : स्वप्न होते मुलीच्या वाढदिवसाचा केक घरीच बनवावा. ते स्वप्न पूर्ण तर झाले, परंतु यासोबत नाशिकच्या तेजस्विनी खैरनार या गृहिणीला एक नवीन व्यवसायदेखील मिळाला आहे. मुलीच्या वाढदिवसासाठी बनवलेल्या केकमुळे आज त्यांना संपूर्ण नाशिकमध्ये नवीन ओळख मिळाली. तेजस्विनी आपल्या घरी ऑर्डरप्रमाणे केक बनवून विक्री करत असतात. इतकेच नाही तर या माध्यमातून महिन्याला 60 ते 70 हजारांचे उत्पन्नदेखील घेत असतात.
advertisement

तेजस्विनी बी.कॉम आणि डी.एड. या क्षेत्रातील पदवीधर आहेत. तसेच सुरुवातीला तेजस्विनी यांनी एका शाळेत शिक्षिकेची नोकरीदेखील केली आहे. मुलीच्या वाढदिवसाला आपण स्वतः आपल्या हाताने केक बनवावा असे त्यांचे स्वप्न होते. त्याकरता त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच क्लासेसच्या माध्यमातून केक बनवणे शिकून घेतले. घरी केक बनवले की त्या स्टेटसला त्याचे फोटो टाकत असत. असे करता करता त्यांना केक बनवण्यासाठी जवळपासच्या लोकांकडून मागणी होऊ लागली.

advertisement

Famous Bread Patties Pune: पारंपरिक अस्सल चव, ब्रेड पॅटिस खावा तर पुण्यात इथंच, असते मोठी गर्दी

आपण यात व्यवसाय करूया असे त्यांनी ठरवले. नोकरी करत असताना घरच्या काही खासगी समस्यांमुळे त्यांना जॉब हा सोडावा लागला. त्यानंतर घरी रिकामे बसणे हे त्यांना आवडत नसल्याने त्यांनी पुन्हा त्यांचा केक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर पुन्हा नोकरी करावी असे त्यांना वाटले नाही. हळूहळू त्यांच्या केकची चव ही पसरण्यास सुरुवात झाली.

advertisement

कोरोना आधी तेजस्विनी यांनी केक शॉपदेखील सुरू केले होते. परंतु त्यातदेखील अडचणी आल्याने त्यांना ते दुकान बंद करावे लागले. तरीसुद्धा तेजस्विनी यांनी आपली जिद्द सोडली नाही. आज त्या घरून ऑर्डरप्रमाणे केक बनवून विक्री करत असतात.

त्या सांगतातजॉबमध्ये मी जितके पैसे कमावू शकले असतेत्यापेक्षा अधिक आज मी उत्पन्न घेत आहे. परिवाराला सांभाळत आज महिन्याला तेजस्विनी या 60 ते 70 हजारांचे उत्पन्न घेत असतात. तुम्हालादेखील यांचे केक हे ऑर्डर करून घ्यायचे असल्यासतुम्ही त्यांच्या तेजस्विनी केक या इंस्टाग्राम पेजवरून ऑर्डर करू शकणार आहाततसेच त्यांचे घर हे पिंटू कॉलनी, वैशाली नगर, सारसबाग सोसायटीजेल रोड, नाशिक या ठिकाणी आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: लेकीच्या वाढदिवसासाठी बनवला केक, तेजस्विनीला मिळाली बिझनेस आयडिया, आता महिन्याला 70 हजार कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल