नाशिक येथील दिपाली, स्नेहल आणि रुपाली या तिघी महिलांनी मिळून नाशिकपासून जवळच असणाऱ्या कशपी डॅमजवळ धोंडेगावामध्ये बहार पिकनिक पॉईंट चालू केला आहे. ज्यामुळे यांना एक वेगळीच ओळख मिळाली आहे. या तिघी महिला जिवलग मैत्रिणी आहेत. त्याचबरोबर उच्चशिक्षित असून या तिघीही शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. परंतु आता आपल्या या व्यवसायाला चालना देण्यासाठी सरळ नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ त्यांच्या या व्यवसायाला त्या देत असतात.
advertisement
दिपाली, रुपाली आणि स्नेहल यांच्या घरातील मंडळी सर्व शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या देखील सुनांनी शिक्षिका म्हणून नोकरी करावी असे त्यांच्या सासू-सासऱ्यांना वाटले याकरता त्यांनी यांना डी.एड. मध्ये प्रवेश घेऊन दिला. रुपाली आणि दिपाली या दोघी सख्या बहिणी आणि सख्या जावा देखील आहेत. तसेच स्नेहल ही त्यांची कॉलेजपासूनची मैत्रीण.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या तिघींनी 11 वर्ष शिक्षिकेची नोकरी केली. शाळेला सुट्टी असली की या तिघी मैत्रिणी बाहेर फिरायला जात असत. त्या वेळेस यांच्या या जागेवर त्यांनी काहीतरी व्यवसाय सुरू करूया हा विचार केला. असता त्यांची सुरुवात ही या जागेला महिलांना पार्टीसाठी देण्यापासून झाली. तर आज यांनी या ठिकाणी एक भले मोठे पिकनिक स्पॉट बनवले आहे. तसेच आज या तिघी मैत्रिणी आपली नोकरी सोडून पूर्ण वेळ या ठिकाणी देत असतात.
या तिघी सांगतात नोकरी सोडताना मनामध्ये थोडी भीती होती. कारण एक ठराविक रक्कम दर महिन्याला हातात येत होती आणि आता ती बंद होणार. आपण व्यवसाय करू शकणार का? पण कुटुंबाने त्यांना भक्कम पाठिंबा दिला आणि सांगितलं की काहीही झालं तरी तुम्हांला आमची पक्की साथ असेल. याच पाठिंब्यामुळे एक जिद्द मनात निर्माण झाली आणि जिद्द असेल तर आपण सगळ्या गोष्टींवर मात करू शकतो हेच खरं ठरलं. नोकरीत करत असताना जो पगार दर महिन्याला हातात यायचा त्यापेक्षा काहीक पटीने आज त्यांना पैसे हे मिळत असल्याचे त्यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
या त्रिदेवी आज बहार नावाचे आणि तेही नावाजलेला एक पिकनिक पॉइंट चालवत आहेत. यामधून त्यांना महिन्याला 3 लाख कमाई होत आहे. यात डे पिकनिक, स्टेकेशन, मिसळथाळी, पिठलं भाकरी आणि याचबरोबर शेतीचा परिसर अशा विविध गोष्टी आहेत. या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी सुंदर असे घर त्यांनी बांधले आहेत. त्याच ठिकाणी विहिरीचे पाणी असलेले स्विमिंग पूल सुद्धा आहे. यात तुम्ही खेळून थकलात तर आपल्या हाताने बनवलेले पदार्थ या तिघी बनवून खाऊ घालत असतात.
यांच्या या पिकनिक पॉइंटला भेट द्यायची असल्यास तुम्ही नाशिकपासून जवळच असणारे कशपी डॅमजवळ असलेल्या धोंडेगावामध्ये बहार पिकनिक पॉईंट या ठिकाणी जाऊ शकतात.