Farmer Success Story: पारंपरिक शेतीत मिळत नव्हतं उत्पन्न, शेतकऱ्यानं केला 300 झाडांचा नवीन प्रयोग, कमाई 10 लाख

Last Updated:

Framer Success Story: पारंपारिक पिके फारसं उत्पन्न मिळवून देत असल्याने शेतकरी वेगवेगळ्या नवीन पिकांकडे वळत असल्याचे पाहायला मिळतंय. प्रल्हाद येळेकर या तरुण शेतकऱ्याने शेतीमधून 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 

+
News18

News18

 जालना: मराठवाड्यातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. पारंपरिक पिके फारसं उत्पन्न मिळवून देत असल्याने शेतकरी वेगवेगळ्या नवीन पिकांकडे वळत असल्याचे पाहायला मिळतंय. अंबड तालुक्यातील आलमगाव येथील प्रल्हाद येळेकर या तरुण शेतकऱ्याने जांभूळ शेतीमधून 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आलमगाव येथील प्रल्हाद येळेकर यांनी वडिलांच्या सल्ल्यानुसार जांभूळ शेतीचा पर्याय निवडला. कोकण विद्यापीठाने विकसित केलेली कोकण भरवली ही जांभळाची जात त्यांनी आपल्या शेतामध्ये लावली आहे. दीड एकर शेतामध्ये पंधरा बाय 16 अंतरावर 300 जांभळांची झाडे लावण्यात आली. 2015 मध्ये या रोपांची लागवड करण्यात आली.
तब्बल 6 ते 7 वर्ष या झाडांना पाहिजे त्या प्रमाणात फळे लागत नव्हती. त्यामुळे निराश झालेले येळेकर बाग काढून टाकण्याच्या विचारात होते. परंतु आठव्या वर्षी त्यांच्या बागेला चांगली जांभळे लागली. यानंतर उत्पादनात वाढ होण्यास सुरुवात झाली.
advertisement
मागील वर्षी त्यांना या जांभूळ शेतीमधून तब्बल 8 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळालं. यावर्षी 10 ते 12 लाखांचे निव्वळ उत्पन्न जांभूळ शेतीमधून झाले आहे. व्यापारी जाग्यावरूनच जांभळांची दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलो या दराने खरेदी करत आहेत. एका झाडावर साधारणपणे 40 किलो जांभळं निघत असल्याचे येळेकर यांनी सांगितलं.
advertisement
मराठवाड्यात पारंपरिक पिकांपेक्षा इतर फळपिक फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीतरी नवीन उत्पन्न वाढवावं आणि प्रगती करावी, असं आवाहन तरुण शेतकरी प्रल्हाद येळेकर यांनी नव तरुणांना केले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: पारंपरिक शेतीत मिळत नव्हतं उत्पन्न, शेतकऱ्यानं केला 300 झाडांचा नवीन प्रयोग, कमाई 10 लाख
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement