देशात कर्करोगाने मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. यावरील औषधांचा खर्चही भरपूर होता. परिणामी अनेकांना हा खर्च पेलवत नव्हता. हाच भार कमी करण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पातील घोषणेमध्ये कर्करोगाच्या औषधांवरून कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्करोगाची औषधे स्वस्त होणार असून या आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कस्टम ड्युटी हटवल्यामुळे रुग्णांना औषधांसाठी कमी किंमत मोजावी लागणार आहे. औषधांवरून कस्टम ड्युटी हटवण्याबरोबरच अनेक वैद्यकीय उपकरणांवरही सूट मिळणार आहे. याचा फायदा रुग्णांनाही होणार आहे.
advertisement
याआधीही सरकारने काही कॅन्सरची औषधे स्वस्त केली होती. गेल्या वर्षी सरकारने कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या पेम्ब्रोलिझुमॅब या औषधावरील सीमाशुल्कही हटवले होते. त्यामुळे या औषधाची किंमत कमी करण्यात आली.
कोणती तीन औषधे स्वस्त होणार?
कॅन्सर उपचारात महत्त्वाची ठरणारी 3 औषधांवरील सीमा शूल्क हटवल्याने आता ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन, ओसिमरटिनिब आणि दुर्वालुमॅब स्वस्त होईल. डेरेक्सटेकन औषध हे स्तनाच्या कर्करोगाचे औषध आहे आणि HER2 पॉझिटिव्ह जनुकांसह सर्व कर्करोगांमध्ये वापरले जाऊ शकते. Osimertinib हे EGFR फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी एक औषध आहे. Durvalumab हे फुफ्फुस आणि पित्तविषयक मार्गाच्या कर्करोगासाठी औषध आहे. हे एक इम्युनोथेरपी औषध आहे जे PD-L1 प्रथिने अवरोधित करून कार्य करते, जे रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यास मदत करते. याचा उपयोग नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) आणि युरोथेलियल कार्सिनोमा (मूत्राशयाचा कर्करोग) वर उपचार करण्यासाठी केला जातो.
वाचा - मोदी 3.0 च्या पहिल्या बजेटमध्ये करदात्यांना मोठी भेट; या लोकांना टॅक्समध्ये सूट
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात एक्स-रे ट्यूब आणि डिजिटल डिटेक्टरवरील कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता भारतात डिजिटल एक्स-रे मशीनच्या स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल.
सिगारेटचे दर जैसे थे..
एकीकडे कँसरच्या औषधांवर सीमा शूल्क कमी केले असले तरी सिगारेटचे दर तसेच राहणार आहेत. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.