TRENDING:

Union Budget 2025: 64 वर्ष जुना आयकर कायदा बदलणार? नवं विधेयक सादर होण्याची शक्यता

Last Updated:

Union Budget 2025: नव्या विधेयकात पानांची संख्या तब्बल 60 टक्के कमी असू शकते. आयकर अधिनियम 1961मध्ये मोठी सुधारणा करण्याची घोषणा सीतारामन यांनी जुलै 2024मध्ये सादर केलेल्या बजेटमध्ये केली होती.

advertisement
Union Budget 2025: संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असून, ते चार एप्रिलपर्यंत चालणार आहे. यातलं पहिलं सत्र 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. त्यानंतर 2024-25 या वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जाईल. एक फेब्रुवारीला 2025-26चं केंद्रीय बजेट अर्थात अर्थसंकल्प सादर केला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र 10 मार्च ते चार एप्रिलपर्यंत असेल. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात नवा आयकर कायदा संसदेत सादर केला जाण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ या.
Union Budget 2025: 64 वर्ष जुना आयकर कायदा बदलणार? नवं विधेयक सादर होण्याची शक्यता
Union Budget 2025: 64 वर्ष जुना आयकर कायदा बदलणार? नवं विधेयक सादर होण्याची शक्यता
advertisement

अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला बजेट सादर करणार असून, ते त्यांचं आठवं बजेट असेल. सध्याचा इन्कम टॅक्स कायदा 64 वर्षं जुना असून, इन्कम टॅक्स प्रणाली अधिक समजण्यासारखी असावी म्हणून नवं इन्कम टॅक्स विधेयक या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सादर केलं जाण्याची शक्यता आहे. नव्या विधेयकात पानांची संख्या तब्बल 60 टक्के कमी असू शकते. आयकर अधिनियम 1961मध्ये मोठी सुधारणा करण्याची घोषणा सीतारामन यांनी जुलै 2024मध्ये सादर केलेल्या बजेटमध्ये केली होती.

advertisement

Income Tax: 90,000 लोकांना पुन्हा भरावा लागणार इनकम टॅक्स, काय आहे कारण?

जुलै 2024मधल्या भाषणात सीतारामन यांनी सांगितलं होतं, की जुन्या आकर अधिनियमात सुधारणा करण्याचा उद्देश हा आहे, की तो समजण्यास सोपा आणि सुस्पष्ट असावा. त्यामुळे त्यावरून होणारे वाद कमी होतील आणि करदात्यांना स्पष्टता मिळेल. त्यामुळे खटल्यांची संख्या घटेल. ही सुधारणेची प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे.

advertisement

सीतारामन यांच्या या घोषणेनंतर सीबीडीटीने या सुधारणेसाठी एक अंतर्गत समिती तयार केली होती. त्यात चर्चा होऊन करदात्यांना अधिक स्पष्टता येण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला जाणार आहे. जुन्या आयकर अधिनियमात सुधारणेसाठी, विविध पैलूंच्या अभ्यासासाठी 22 विशेष उपसमित्याही स्थापन करण्यात आल्या. जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या. स्टेकहोल्डर्सकडून 6500 सूचना प्राप्त झाल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरतुदींची संख्या कमी केली जाईल, अप्रचलित तरतुदी काढून टाकल्या जातील. प्रत्यक्ष कर आणि अन्य कर मिळून आयकर अधिनियमात 298 कलमं आणि 23 अध्याय आहेत. सुधारणेनंतर त्यांची संख्या कमी होईल.

advertisement

Budget 2025 Interesting Facts: बजेटच्या बॅगचा रंग लालच का असतो?

मराठी बातम्या/मनी/
Union Budget 2025: 64 वर्ष जुना आयकर कायदा बदलणार? नवं विधेयक सादर होण्याची शक्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल