TRENDING:

UPI Payment: तुमचेही UPI पेमेंट अधेमधे अडकतात? लगेच सावध व्हा, ही आहेत 5 कारण

Last Updated:

UPI Payment: UPI पेमेंट फेल होणे किंवा अडकणे यामागे अनेक कारणे असू शकतात. जर तुम्हाला ही समस्या दररोज होत असेल तर आज आम्ही तुम्हाला पेमेंट अडकण्यामागील कारणे सांगणार आहोत.

advertisement
मुंबई : गेल्या काही वर्षांत डिजिटल अर्थात ऑनलाईन पेमेंट करण्याचं प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी जवळ रोख रक्कम बाळगण्याची फारशी गरज राहिलेली नाही. ऑनलाईन पेमेंटकडे वाढता कल पाहता, अनेक मोबाईल अ‍ॅप्स उपलब्ध झाली आहेत. पण ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआय हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. काहीवेळा आपण एखाद्या व्यक्तीला यूपीआयवरून पेमेंट केल्यावर ते फेल झाल्याचा मेसेज मोबाईलवर येतो. अशा स्थितीत आपल्या अकाउंटवरुन पैसे वजा देखील झालेले असतात पण ते समोरील व्यक्तीच्या अकाउंटला जमा झालेले नसतात. खरंतर हा अनुभव प्रत्येकाला येतो. यामागे काही कारणं असू शकतात.
यूपीआय पेमेंट
यूपीआय पेमेंट
advertisement

काही वेळा यूपीआय पेमेंट करताना ट्रान्झॅक्शन तर सुरू होतं, पण त्यात मध्येच व्यत्यय येतो. अशा स्थितीत तुम्ही काहीसे घाबरून जाणं स्वाभाविक आहे. पण पेमेंट फेल होण्यामागं काही कारणं असतात. जर तुम्हाला रोजच ही समस्या जाणवत असेल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

यूपीआयवरुन पेमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करताना तुमच्या स्मार्टफोनचं इंटरनेट कनेक्शन सुरू ठेवणं आणि त्याचा स्पीड चांगला असणं गरजेचं आहे. तसेच पेमेंटवेळी अचूक यूपीआय आयडी आणि एमपिन काळजीपूर्वक टाकावा. ऑनलाईन व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या बँक अकाउंटमधील शिल्लक रकमेची माहिती घ्यावी. तसेच तुमच्या बँकेने यूपीआय पेमेंटसाठी रोजची व्यवहार मर्यादा किती ठेवली आहे ते जाणून घ्यावं. जर यूपीआय पेमेंट करताना काही समस्या निर्माण झाली तर तातडीने तुमची बँक किंवा यूपीआय अ‍ॅप कस्टमर केअरशी संपर्क करावा. यूपीआयद्वारे व्यवहारासाठी लेटेस्ट यूपीआय अ‍ॅप वापरावे. व्यवहार केल्यावर तो यशस्वी झाला असल्याचा मेसेज तपासून पाहावा. यूपीआयद्वारे व्यवहार करण्यासाठी दमदार पासवर्ड आणि एमपिनचा वापर करा.

advertisement

यूपीआयद्वारे पेमेंट करताना ते फेल होण्यामागे काही कारणं असतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे एका कारण यामागे असू शकते. काहीवेळा कमकुवत किंवा अस्थिर इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे यूपीआय पेमेंट फेल होतं. बँकेच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला असल्यास यूपीआय पेमेंट करताना अडचणी उद्भवतात. चुकीचा यूपीआय आयडी किंवा एमपिन टाकल्याने पेमेंट फेल होते. तुमच्या बँक अकाउंटमध्ये पुरेसा बॅलन्स नसेल आणि तुम्ही त्याची माहिती न घेता पेमेंट केले तर ते फेल होते. काही बँकांनी यूपीआयद्वारे पेमेंट करण्यासाठी रोजच्या व्यवहारावर काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त वेळा व्यवहार केला तर पेमेंट फेल होऊ शकतं.

advertisement

वाचा - property खरेदीतही महिलांचीच बाजी, तब्बल 5500 कोटींच्या झाल्या मालकीण, राज्यात...

जर तुमचं यूपीआय पेमेंट काही कारणांमुळे फेल झालं तर पुन्हा पेमेंट करण्याचा प्रयत्न करा.जर पेमेंट `Pending` असं मेसेज दिसत असेल तर यूपीआय अ‍ॅपच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा. जर पेमेंट `Failed` असा मेसेज आला असेल पण तुमच्या अकाउंटवरून पैसे कापले गेले असतील तर पैसे परत मिळवण्यासाठी बँकेशी संपर्क करावा. सामान्यपणे यूपीआय पेमेंट काही सेकंदात होते. पण काही वेळा त्यासाठी काही मिनिटं लागतात.जर तुम्हाला यूपीआय पेमेंट करताना काही समस्या जाणवत असतील तर घाबरून जाण्याचं कारण नाही. या गोष्टींच्या मदतीनं तुमची समस्या दूर होऊ शकते.

advertisement

याबाबत अधिक माहितीसाठी एनसीपीआयच्या https://www.ncpi.org.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तसेच तुमच्या बँकेच्या किंवा यूपीआय अ‍ॅपच्या वेबसाइटवर जाऊन खात्रीशीर माहिती मिळवा.

मराठी बातम्या/मनी/
UPI Payment: तुमचेही UPI पेमेंट अधेमधे अडकतात? लगेच सावध व्हा, ही आहेत 5 कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल