property खरेदीतही महिलांचीच बाजी, तब्बल 5500 कोटींच्या झाल्या मालकीण, राज्यात या शहराचा पहिला क्रमांक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
महिलांच्या नावावर एवढ्या संपत्तीची नोंद राज्यात कुठेही झालेली नाही. अशाप्रकारे महिला एका आर्थिक वर्षात 5500 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालक झाल्या आहेत.
राहुल दवे, प्रतिनिधी
इंदौर : आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने कार्य करताना दिसत आहेत. यातच आता सर्वात स्वच्छ शहर समजल्या जाणाऱ्या इंदूर येथील महिलांनी आणखी एक विक्रम केला आहे. मालमत्ता खरेदीतही इंदूर येथील महिलांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. मध्यप्रदेशच्या इंदूरमधील महिलांच्या नावावर सर्वाधिक मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये इंदूरमध्ये झालेल्या एकूण नोंदणीपैकी 38 टक्के नोंदणी महिलांच्या नावावर आहे. महिलांच्या नावावरील प्रॉपर्टी रजिस्ट्रीचा विचार केला असता या महिला गेल्या आर्थिक वर्षात 5500 कोटी रुपयांच्या मालक झाल्या आहेत. महिलांच्या या रेकॉर्डची सर्वत्र चर्चा होत आहे.
advertisement
एका वर्षात इतकी कागदपत्रे झाली तयार -
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये इंदूर जिल्ह्यात 1 लाख 75 हजार 950 नोंदणी कागदपत्रे तयार करण्यात आली. यातून सरकारला 2415 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तर सरकारने 2540 कोटींचे उद्दिष्ट दिले होते. नोंदणीमध्ये महिलांच्या नावे विक्रम झाला. इंदूरमध्ये वर्षभरात 93 हजार 500 मालमत्तांची नोंदणी झाली. यामध्ये 36 हजार 275 रजिस्ट्री महिलांच्या नावावर आहेत.
advertisement
Career After 12th : बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे बेस्ट ऑप्शन, लाखो रुपये मिळणार पगार, आताच वाचा...
हे प्रमाण एकूण नोंदणीच्या 38 टक्के आहे. महिलांच्या नावावर एवढ्या संपत्तीची नोंद राज्यात कुठेही झालेली नाही. अशाप्रकारे इंदूरच्या महिला एका आर्थिक वर्षात 5500 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालक झाल्या आहेत. तसेच त्यांनी सरकारला 430 कोटी रुपयांचा महसूल दिला आहे.
advertisement
नोंदणीवर मिळते सवलत -
मध्य प्रदेश सरकारने महिलाच्या नावावर होणाऱ्या नोंदणीवर दोन टक्के सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. याच कारणाने इंदूरमध्ये आतापर्यंत महिलांच्या नावावर अनेक नोंदणी झाल्या. शहरी भागात 12.5 रुपये आणि ग्रामीण भागात 9.5 रुपये या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते. नोंदणीमध्ये दोन टक्क्यांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे हजारो रुपयांचा फरक पडतो. त्यामुळे एक कारण हेसुद्धा आहे की, महिला सशक्त आणि स्वावलंबी होत आहेत. कारण बहुतांश मालमत्ता कर्जावर घेतली जाते आणि यासाठी बँक उत्पन्नाचा स्रोत आणि आयकर फाइल पाहते.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
April 06, 2024 1:28 PM IST
मराठी बातम्या/मनी/
property खरेदीतही महिलांचीच बाजी, तब्बल 5500 कोटींच्या झाल्या मालकीण, राज्यात या शहराचा पहिला क्रमांक