जर तुम्ही नोकरी सोडली असेल किंवा सध्या अशा ठिकाणी काम करत असाल जिथे PF कपात होत नाही, तरी काळजी करण्याची गरज नाही. तुमचा EPF मधील जमा पैसा पूर्णपणे सुरक्षित असतो. फक्त काही नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
नोकरी सोडल्यानंतर तुमच्या PF खात्यात नवीन रक्कम जमा होत नसली तरीही, पहिल्या तीन वर्षांपर्यंत त्या खात्यावर व्याज मिळतं. म्हणजे, पैसा थांबत नाही, वाढतच राहतो.
advertisement
पण जर सलग 36 महिन्यांपर्यंत कोणतीही रक्कम जमा झाली नाही, तर तुमचं PF खाते निष्क्रिय (Inactive) होतं. यानंतर त्यावर व्याज मिळणं थांबतं, पण तुमचं मूळ भांडवल आणि त्या आधीचं व्याज पूर्णपणे सुरक्षित राहतं. तुम्ही ते नंतर कधीही काढू शकता.
जर तुम्ही दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल, तर तुम्ही तुमच्या EPF मधील रक्कम काढू शकता. मात्र, जर तुमची सेवा 5 वर्षांपेक्षा कमी असेल, तर या रकमेवर टॅक्स लागू होतो. पण 5 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर काढलेला पैसा टॅक्स-फ्री असतो.
नवीन नोकरी लागल्यानंतर जुना PF अकाउंट बंद करू नका. कारण तुमच्याकडे असलेला UAN (Universal Account Number) हा एकच असतो. त्याच UAN अंतर्गत नवीन PF खाते लिंक केल्यास तुमचा संपूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड एकत्र राहतो, व्याज सातत्याने मिळतं आणि टॅक्ससंबंधी त्रास टाळता येतो.
अनेक वेळा लोक KYC अपडेट न केल्यामुळे किंवा जुने खाते दुर्लक्षित केल्यामुळे नंतर पैसे काढताना अडचणीत येतात. त्यामुळे तुमचं आधार, बँक अकाउंट आणि इतर KYC डिटेल्स नेहमी अपडेट ठेवा. जर तुमच्याकडे अनेक PF खाते असतील, तर त्यांना मर्ज करा. त्यामुळे बचत आणि व्याजावर नियंत्रण ठेवणं सोपं जाईल.
