जपानमधील ताकामात्सू येथे आतापर्यंतचे सर्वात महागडे बोन्साय ट्री 13 लाख डॉलर किंवा 10.74 कोटी रुपयांना विकले गेले आहे. हे जपानी व्हाइट पाइन आहे. बोन्साय झाड एका लहान भांड्यात वाढवता येते. त्याची उंची 2 फुटांपर्यंत जाते. आजही तुम्हाला 300-400 वर्षे जुनी बोन्साय झाडं पाहायला मिळतील. जुन्या झाडांची वाढ पाहून त्यांच्या दीर्घायुष्याचाही अंदाज येतो. पण इतकी वर्षे जिवंत असूनही ही झाडं फार कमी एरियात आपली मुळे आणि फांद्या पसरवतो. म्हणूनच घराच्या सजावटीसाठी हे सर्वोत्तम साहित्य मानले जाते. तुम्ही 1000-2000 रुपयांमध्ये एक लहान आणि अगदी नवीन बोन्साय ट्री देखील खरेदी करू शकता.
advertisement
एवढं महाग का असतं?
हे झाड तुम्हाला फळ देत नाही किंवा त्याचे लाकूड आफ्रिकन ब्लॅकवुडसारखे कापून फर्निचर किंवा वाद्ये इत्यादी बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. असे असूनही ते इतके महाग का, या प्रश्नाचे उत्तर अनेकजण देऊ शकत नाही. खरंतर, बोन्सायकडे झाड म्हणून नाही तर एक कला म्हणून पाहिलं जातं. तुम्ही याला एक महागडी पेंटिंग समजू शकता. बोन्साय उगवणारे लोक सांगतात की ही एक कला आहे ज्यामध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी तुम्हाला अनेक वर्षे कठोर परिश्रम करावे लागतील. हे झाड एका कुंडीत ठेवण्यासाठी त्याची सतत छाटणी, वायरिंग, दुसऱ्या कुंडीत बदल आणि कलम करणे आवश्यक आहे. एकाच ठिकाणी अनेक बोन्साय झाडे एकत्र ठेवली तर त्यातून बटू जंगलासारखे दृश्य निर्माण होते. ज्या प्रमाणे एखाद्या मोठ्या कलाकाराच्या चित्राला प्रत्यक्ष जीवनात कोणताही उपयोग नसतो आणि तरीही ती कोट्यवधींमध्ये विकली जाते. त्याचप्रमाणे, बोन्साय वृक्ष ही देखील शतकानुशतके जुनी कला आहे, त्याची किंमत कितीही असू शकते.
IRCTC चा नवा प्लान! नेपाळसह या शेजारील देशांची स्वस्तात करुन या सैर
बोन्साय झाडे किती जुनी आहेत?
आपण म्हटल्याप्रमाणे बोन्सायचे झाड जितके जुने होईल तितकी त्याची किंमत वाढते. अर्थात, काही किंमत त्याच्या डिझाइनवर देखील अवलंबून असते. शेकडो वर्षे जुनी बोन्सायची झाडे आज जगभर आहेत. बिझनेस इनसाइडरमधील एका स्टोरीनुसार, 800 वर्षे जुने बोन्सायचे झाड देखील अस्तित्वात आहे. या कलेचा उगम चीनमधून झाला आहे. पण, ते प्रसिद्ध जपानमधून झालेय.
