IRCTC चा नवा प्लान! नेपाळसह या शेजारील देशांची स्वस्तात करुन या सैर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आयआरसीटीसीने लोकांची आवड पाहता नेपाळसह आणखी एका देशाची यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे दोन्ही देशांची यात्रा आयआरसीटीसी पॅकेज अंतर्गत केली जाऊ शकते.
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट: आयआरसीटीसी भारत गौरव यात्रेअंतर्गत पॅकेज लॉन्च करत असते. ज्यामुळे प्रवास सुविधाजनक होऊ शकतो आणि प्रवासी त्याचा आनंद घेऊ शकता. देशातील विविध भागांसोबतच नेपाळची यात्रा घडवून आणली जात आहे. आयआरसीटीसीद्वारे चालवली जात असलेली स्पेशल ट्रेन लोकांना खूप पसंतीस पडत आहेत. लोकांची आवड लक्षात घेता नेपाळसह आणखी एका देशाची यात्रा घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारे दोन्ही देशांची यात्रा आयआरसीटीच्या पॅकेजअंतर्गत केली जाऊ शकते.
पर्यटकांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाचा प्रचंड कल पाहता, IRCTC ने श्रीलंका आणि नेपाळ या दोन महत्त्वाच्या टूर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्लीतून नेपाळ टूरमध्ये तुम्ही काठमांडू आणि पोखरा दरम्यान प्रवास कराल.
हा एक फ्लाइट टूर आहे ज्यामध्ये तुम्ही दिल्ली ते काठमांडू फ्लाइटने प्रवास कराल. या पॅकेजमध्ये तुम्ही 21 ऑगस्टला दिल्लीहून काठमांडूला जाणार आहात. 3 स्टार हॉटेलमध्ये तुमची राहण्याची व्यवस्था असेल. रोजचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोय या पॅकेजमध्ये केली जाणार आहे.
advertisement
काठमांडूमध्ये, तुम्हाला पशुपती नाथ मंदिर, पाटण आणि तिबेट निर्वासित कॅम्प इत्यादींना भेट देता येईल. त्याच वेळी, पोखरामध्ये, तुम्हाला मनोकामना मंदिर आणि सुंदर पर्वतांना भेट देण्याची संधी मिळेल, याशिवाय तुम्ही श्रीलंकेला जाऊ शकता. येथेही तुम्हाला अनेक ठिकाणी भेट देण्याची संधी मिळेल.
advertisement
सर्वत्र फिरण्यासाठी तुम्हाला एसी डिलक्स बस आणि हिंदी आणि इंग्रजी भाषिक गाइडची सुविधा मिळेल. हा संपूर्ण टूर 6 दिवस आणि 5 रात्रीचा आहे. या टूरला तुम्ही एकटे गेल्यास 48000 रुपये फी भरावी लागेल. त्याच वेळी लोकांना दोन व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती 38,900 रुपये आणि तीन लोकांसाठी 38,000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. IRCTC ने Paytm आणि Razorpay सारख्या पेमेंट गेटवे संस्थांशी करार केला आहे जेणेकरून सुलभ हप्त्यांमध्ये डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करून टूरची बुकिंग प्रक्रिया सुलभ होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 05, 2023 10:12 AM IST










