Uddhav Thackeray: ठाकरेंच्या सभेत पहिल्यांदाच असं घडलं, उद्धव ठाकरे झाले भावुक, जे बोलले ते ऐकून सगळेच भारावले

Last Updated:

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त अशी विराट सभा  पार पडली. राज ठाकरे यांच्या खणखणीत भाषणानंतर उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले.

News18
News18
नाशिक : मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकाच्या निवडणुकीत एकत्र आले. नाशिकमध्ये पहिलीच ठाकरे बंधूंची सभा एकत्र पार पडली. पहिल्यांदाच पालिका निवडणुकीत दोन्ही बंधू एकत्र सभेला आल्यामुळे कार्यकर्त्यांनी विराट अशी गर्दी केली होती. भाषणाचा पहिला मान हा  राज ठाकरेंना देण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. पण, या सभेत दोन्ही भावांचा भावनिक आणि आदरयुक्त अंदाज नाशिककरांनी अनुभवला.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त अशी विराट सभा  पार पडली. राज ठाकरे यांच्या खणखणीत भाषणानंतर उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले. नेहमी, उद्धव ठाकरे हे सभेला उद्देशुन  माझ्या बंधू भगिनी आणि हिंदू मातांनो असं म्हणून भाषणाला सुरुवात केली आणि "गेल्या दोन वर्षातली ही माझी चौथी सभा आहे.  आजच्या सभेत मला खूप आनंद होत आहे, कारण माझ्यासोबत माझा भाऊ, मनसेचा अध्यक्ष राज ठाकरे सोबत आहे, असं म्हणत भावुक झाले होते.
advertisement
"राज ठाकरे यांनी मोठ्या अभिमानाने नाशिकमध्ये काय काम केलं हे सांगत आहे. मुंबईमध्ये शिवसेनेनं केलेली काम करणारे दोन भाऊ एकत्र आले तर नाशिकचा काय उत्कर्ष होईल. याचा विचार तुम्ही केला पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला दमदार सुरुवात केली.
"आम्ही वेगळे होतो तर एकत्र का येत नाही विचारत होते, मग आता का पोटात गोळा आला"
शहरात काय सुरू आहे, बेकारी वाढत आहे, गुंडागर्दी वाढत आहे, तस्करी वाढत आहे. अमली पदार्थ वाढत आहे. समस्या त्याच आहे, कुठेही जा एकच भाषण करा. काही फरक पडत नाही.  आमच्या मुलाखती चालू आहे. तुम्ही दोन भाऊ एकत्र आले, असा प्रश्न विचारत आहे, तेव्हा आम्ही वेगळे होतो तेव्हा एकत्र का येत नाही, असं विचारत होते. आता एकत्र आलो तर का आला असं विचारत आहे. तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का, आमच्या अस्तित्वाची चिंता करू नका, शिवसेनेला ६० वर्ष होत आहे. सेनेनं अनेक पराभव पचवले आहे. ही निवडणूक जिथे जिथे शहरात आहे, त्या शहरातील नागरिकांनी आपल्या पिढीचं भविष्य काय आहे, त्यासाठी निवडणूक आहे.
advertisement
प्रभू राम मग काय नमोभवनमध्ये राहिले सांगणार का?
ही राम भूमी आहे. तपोपन भूमी आहे, नमो भवन आम्ही केलं आहे. राम मंदिर केलं म्हणून डंका पिटताय, रामप्रभूचं जिथे वास्तव्य होतं, त्या तपोवननध्ये झाडं तोडून नमोभवन उभारयाचं. उद्या लोकांना काय सांगणार, राम कुठे होता तर नमोभवन मध्ये होता का?
भाजप आज उपटसुंभाचा पक्ष झाला
राज ठाकरे बरोबर बोलले होते, देवेंद्र फडणवीस यांनी हे शहर दत्तक घेतलं, काय विकास करणार आहे. ज्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागत आहे, ते काय शहराचा विकास करणार आहे. त्यामुळे मोहन भागवत यांना टाहो फोडावा लागत आहे, पोरं जन्माला घाला. भाजप आज उपटसुंभाचा पक्ष झाला आहे. गेल्या वेळी पक्षातून काही माणसं कमी झाली. पण व्यासपीठावर आज पुन्हा गर्दी झाली आहे. आम्ही ज्यांना मोठं केलं ते सोडून गेले असतील. पण निष्ठावंत माणसं इथं आहे. मी भाजपवाल्यांना विचारत आहे. काय नशिबी आलं आहे, काय उपटसुभ्यांचा सतरंज्या उचलाायचं काम करत आहे. सलीम कुत्ता साथीदारासोबत फोटो होता, तो पक्ष वाढवायला सगळं चालतं, अशी बरबटलेली माणसं तुम्हाला चालतात, त्यांची शी सू साफ करून डोक्यावर घेऊन नाचायचं. हे निष्ठावंत भाजपच्या नशिबी आलं आहे, असा भाजप तुम्हाला पाहिजे होता का? असा सवालच उद्धव ठाकरेंनी केला.
advertisement
 'भाजपच्या निष्ठावंतांना डिवचलं'
"आम्ही दोघे एकत्र आलो आणि फटाके फोडले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेले, जाऊ द्या. त्यांचं नशिब आणि ते, मला भाजपच्या निष्ठावंत देवयानी ताईंना रडू आवरलं नाही हे आवडलं नाही. आज मी जे बोलतोय त्यावर नक्की टीका करा, ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगताय, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. हे माझं वाक्य नाही देवयानी ताईंचं वाक्य आहे, दलालांनी चुकीचं ब्रिफींग केलं आहे.  सुधीर मुनगंटीवार म्हणताय, भाजपला दरवाजेच नाहीये, मुनगंटीवार तुम्हाला कल्पना आहे, शनीशिंगानापूरला संकटग्रस्त जातात,  पण भाजपमध्ये येतात ईडी, सीबीआयग्रस्त येताय. चोर दरोडखोर सुद्धा येत आहे. उद्या रावण जर पक्षात आला तरी त्याला पक्षात घ्यायला बसले. एवढे निर्ल्लज्ज झाले आहे कुठे आहे, यांचं हिंदूत्व?
advertisement
मी काँग्रेससोबत गेलो मग MIM सोबत भाजप गेली त्याचं काय? 
"भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेससोबत गेलो होतो. आता अकोटमध्ये भाजपने एमआयएम सोबत युती केली, अंबरनाथमध्ये जिथे शिव मंदिर आहे. मिंध्याचा पक्ष होता, तिथे काँग्रेससोबत युती केली. बरं समविचारी म्हणजे काय तर सगळे भ्रष्टाचारी आणि चोर दरोडखोर एकत्र येत आहे. भ्रष्टाचार मेळावा भाजप पक्ष वाढवावा"
advertisement
नाईक तुम्ही टांगा पलटी कराच?
गणेश नाईक हे पहिले आपले, आणि मिंधे हा पण पुर्वीचा आपला. आता गणेश नाईक काय म्हणाले, मिंधेनं एफएसआयमध्ये घोटाळा केला, जर भाजपने परवानगी दिली तर यांचा टांगा उलटा करतो. मग गणेश नाईकांना विचारायचंय, मग टांग्यात कशाला बसायचं. टांगा पाडा की उलटा, टांग्यात टांग्या कशाला घालता. हीच लोक सांगताय, कशी अभद्र युतीत आहे. तुमच्या व्यथांबद्दल कोण बोलतंय.
advertisement
'पेंग्विन पाहण्या लोक तिकीट काढतात, पण मिंधेंना इतकी सुद्धा किंमत नाही'
"आम्ही मुंबईत होल्डिंग लावली आहे, कोस्टल रोड आम्ही केला आहे. इथं कुणालाही पैसे देऊन आणलं नाही. आम्ही पेंग्विंन आणले, होय आम्ही पेंग्विन आणले, ते बघायला लोक तिकीट काढून गर्दी करत आहे. मी या सभेचा उल्लेख यासाठी केला की, यांच्या सभेला लोक पैसे देऊन बोलावे लागतात, पेंग्विन पाहण्या इतकी किंमत सुद्धा यांना नाही. लोक तिकीट काढून पेंग्विन पाहताय, आणि लोक पैसे घेऊन सुद्धा यांच्या सभेला येत नाही.
ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये रस्त्यावर उतरले आहे. यांच्या दडपशाही विरोधात महाराष्ट्र गप्प बसणार आहे का, ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, त्यांच्या हाती तुम्ही सत्ता देणार आहे का, आज वचननामा आहे, तो ठाकरेंचा शब्द आहे. तो बोगस मोदींची गरंटी नाही. आम्ही त्यांच्या कामाचं कधी श्रेय घेतलं नाही. मशाल तुमच्या ह्दयात पेटली पाहिजे, ज्या पद्धतीने यांचा कारभार सुरू आहे.
राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका
तो राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, अध्यक्ष हा निष्पपातीपणे वागला पाहिजे, याच्या घरात भाजप ३ ते ४ उमेदवाराला अर्ज देतात. समोर उमदेवाराने अर्ज मागे घ्यावा यासाठी निवडणूक आयोगाच्या अंगावर धावून जातोय, आम्ही जरासं काही केलं तर निवडणूक आयोग हातोडा घेऊन बसला आहे. यांनी काही केलं तरी निवडणूक आयोग शेपूट घालून बसला आहे, ही झुंडशाही आहे, आज आपण उठून बसलो नाहीतर यांच्या गुलमगिरीमध्ये आपल्याला राहावं लागणार आहे.
अभद्र युतीने ३ लाख कोटींचे घोटाळे केले
आज तपोवनमध्ये छाटण्याचं काम सुरू आहे. इकडे तपोपन कापलं, तिकडे आरेमध्ये झाडं कापली, ताडोबामध्ये झालं. असा विचार करू नका, आज ज्यांच्यावर वेळ झाली, ती उद्या तुमच्यावर येणार आहे. मुंबईत सगळे खोकत आहे, रस्ते खोदून ठेवलं आहे, प्रदुषण झालं आहे मुंबईकरांच्या छातीत धूर साठला आहे. होय, आम्ही एकत्र आलो आहोत, सत्तेसाठी एकत्र आलो आहोत. मग तुम्ही काय विट्टी दांडूसाठी खेळण्यासाठी आला आहेत का, आम्ही आलो सत्तेसाठी एकत्र आलो आहे, सत्ता विकासासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी एकत्र आलो आहे. भांड कशाला लपवायचं,
आज मुंबईमध्ये शाळा बंद पडल्या आहे. महापालिकेमध्ये ८ भाषांमध्ये शिकवतोय. उद्या नाशिकची सत्ता आणून द्या, नाशिकच्या पालिका शाळेत हे करून दाखवायचं आहे. नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय करून दाखवतो. जगातली सर्वात स्वस्त बेस्ट सेवा आम्ही आणली, ती बंद करण्याच्या तयारीत ही लोक आहे. जर करून घ्यायचं नसेल तर हे सगळे घोटाळे आहे. या अभद्र युतीने ३ लाख कोटींचे घोटाळे केले आहे. एसपीटी कंत्राटामध्ये वाद आहे. आम्ही दोन्ही भाऊ मिळून वचन देतो, आजचा वचननामा आमचा शब्द आहे.  दोन्ही हात करून दलालांना दाखवा, गद्दार लोकं विकत घेऊ शकाल निष्ठावंत नाही तुमच्या फडक्यावरील हिरवा रंग काढा आणि मग आम्हाला हिंदुत्व सांगा.  आपलं नाशिक आपल्या हातात ठेवा, दत्तक बाप पाय ठेवायला घाबरला पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray: ठाकरेंच्या सभेत पहिल्यांदाच असं घडलं, उद्धव ठाकरे झाले भावुक, जे बोलले ते ऐकून सगळेच भारावले
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement