प्रीती चोळके यांनी सुरुवातीला 2010 मध्ये लेडीज वेअर व बेबी केअर हे दुकान चालू केले. तेव्हापासून ते दुकान चालू होतं. परंतु कोरोनानंतर बरेच बदल झाले आणि काळानुसार बदललं पाहिजे, अशी जाणीव निर्माण झाली. त्यानुसार आजच्या घडीला आपण काय वेगळं व्यवसाय करू शकतो? असा विचार करत असताना एक कल्पना सूचली. सोनं महाग झालं असून महिला आणि मुलींमध्ये ज्वेलरीची क्रेझ कायम आहे. त्यासाठी ज्वेलरी शॉपचा व्यवसायात सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
advertisement
प्रीती यांनी 17 फेब्रुवारी 2025 ला सखी फॅशन ज्वेलरी या शॉप चा उद्घाटन केलं. त्यांनी नमो ब्रँड ज्वेलरी फ्रेंचाईजी घेतली आहे. त्यांच्या ज्वेलरी शॉप मध्ये सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी, अमेरिकन डायमंड ज्वेलरी, फॅशन ज्वेलरी, ब्रायडर ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, बँगल्स, मायक्रो गोल्ड प्लेट्स ज्वेलरी, अँटिक्वे अमेरिकन डायमंड, एअरिंग ट्रॅडिशनल बँगल्स, गोल्ड प्लेटेड नेकलेस उपलब्ध आहे. सर्व ज्वेलरी ही कॉपर बेस्ड ज्वेलरी असून त्यामुळे ती खराब होत नाही, असं प्रीती सांगतात.
मनात जर जिद्द असेल आणि पक्का निर्णय घेतला तर नक्कीच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवणं सोपं होऊन जातं. त्यामुळे स्वप्न नेहमी मोठी असावी. प्रत्येक महिलांनी छोटासा का होईना स्वतःचा व्यवसाय किंवा जॉब करून घराला हातभार लावावा. जर प्रत्येक महिलेने स्वतःला बिझी ठेवलं तर आनंद आणि निरोगी आयुष्य जगण्यात मदत होईल, असा संदेश यावेळी प्रीती चोळके देतात.