TRENDING:

1500 रुपयांपासून व्यवसाय सुरू, आर्किटेक्ट तरुणी आज कमावतोय लाखो रुपये, नोकरी सोडून आज करतेय हे काम

Last Updated:

न्यूज18 लोकल सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, 2015 पर्यंत त्यांनी मुंबईत आर्किटेक्चरल इंटेरिअर डिझायनर म्हणून काम केले. आठ वर्षे काम केल्यानंतर 2016 मध्ये त्यांनी चॉकलेट बनवण्यास सुरुवात केली.

advertisement
विनय अग्रिहोत्री, प्रतिनिधी
प्रियांका गोगिया
प्रियांका गोगिया
advertisement

भोपाळ : व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनच्या आधी या आठवड्यात रोज-डे, प्रपोज-डे, चॉकलेट डे अशा प्रकारचे दिवस साजरा केले जातात. यामध्ये चॉकलेट डेला प्रियकर प्रेयसी एक दुसऱ्याला त्यांच्या प्रेमामध्ये चॉकलेटसारखा गोडवा राहावा विशेष चॉकलेट गिफ्ट देतात. व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट डेबाबत बोलत असताना एका तरुणीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

भोपाळच्या प्रियांका गोगिया या एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. त्यांना लहानपणापासून चॉकलेटची आवड आहे. त्या एक आर्किटेक्ट आहे आणि मुंबईत इंटीरिअर डिझायनिंगमध्ये काम करायच्या. पण त्यांची चॉकलेटची क्रेझ एवढी होती की लहानपणापासूनचा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि केवळ 1500 रुपये मोजून हाताने बनवलेले चॉकलेट बनवण्याचे काम सुरू केले.

advertisement

न्यूज18 लोकल सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, 2015 पर्यंत त्यांनी मुंबईत आर्किटेक्चरल इंटेरिअर डिझायनर म्हणून काम केले. आठ वर्षे काम केल्यानंतर 2016 मध्ये त्यांनी चॉकलेट बनवण्यास सुरुवात केली. त्यांना लहानपणापासूनच चॉकलेटची आवड आहे. त्यांना चॉकलेट खायला खूप आवडायचं. त्यामुळे 2016 मध्ये त्यांनी 1500 रुपये देऊन चॉकलेट फीस्टलिशिअम नावाची कंपनी सुरू केली.

advertisement

जेव्हा व्यवसाय सुरू झाला तेव्हा त्या 2018 मध्ये भोपाळला परतल्या आणि पूर्ण समर्पणाने त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यांनी सांगितेल की, त्या घरी चॉकलेट बनवतात. या चॉकलेट फीस्टलिसियम नावाच्या कंपनीकडून लोक ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. याशिवाय त्या वेगवेगळ्या ठिकाणी भरवलेल्या प्रदर्शनांमध्येही भाग घेात. तिथून त्यांच्या या व्यवसायाला प्रसिद्धी मिळते.

विमानतळावर सुरू करायचंय चॉकलेट स्टुडिओ -

advertisement

प्रियांकाने बनवलेल्या चॉकलेटमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर करण्यात आला आहे. सुका मेवा, डी-हायड्रेटेड ताजी फळे, दूध, कोको इत्यादींचा वापर केला जातो. त्यांनी सांगितले की, त्या 50 प्रकारची चवीची चॉकलेट्स बनवतात. प्रियंका यांनी त्यांच्या चॉकलेट्स दुबई, सिंगापूर, अमेरिकेतही पाठवल्या आहेत. प्रत्येक विमानतळावर त्यांचा चॉकलेट स्टुडिओ असावा हे त्यांचे स्वप्न आहे.

ही वरात नव्हे तर अंत्ययात्रा, तरी डीजेच्या तालावर नाचले लोक, नेमका काय हा प्रकार?

advertisement

प्रियांका यांनी बनवलेल्या चॉकलेट्समध्ये स्ट्रॉबेरी चॉकलेट, व्हाइट बार चॉकलेट, फ्लॉवर चॉकलेट, गॅलेक्सी कलर्ड चॉकलेट, मिल्क बार चॉकलेट, मार्बल चॉकलेट, डार्क चॉकलेट इत्यादी फ्लेवर्सचा समावेश आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण हे चॉकलेट खाऊ शकतात. कारण ते शुगर फ्री असून शुगर मिडीयम चॉकलेट्स इ. चॉकलेटची किंमत 10 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत आहे. या व्यवसायातून वर्षाला लाखो रुपये मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या/मनी/
1500 रुपयांपासून व्यवसाय सुरू, आर्किटेक्ट तरुणी आज कमावतोय लाखो रुपये, नोकरी सोडून आज करतेय हे काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल