ही वरात नव्हे तर अंत्ययात्रा, तरी डीजेच्या तालावर नाचले लोक, नेमका काय हा प्रकार?

Last Updated:

यावेळी डीजेच्या तालावर भोजपुरी होळी गीत वाजवण्यात आले. यावेळी मृताचे कुटुंबीय एक दुसऱ्याला गुलाल लावत नाचत होते. एक ट्रॅक्टर रंगीबेरंगी फुग्यांनी सजवला होता.

अंत्ययात्रेतील दृश्य
अंत्ययात्रेतील दृश्य
गौरव सिंह, प्रतिनिधी
भोजपुर : बिहारच्या आरा येथे एक अनोखी अंत्ययात्रा पाहायला मिळाली. या अंत्ययात्रेत लोक शोक व्यक्त न करता आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाले. याठिकाणी एका 100 पेक्षा जास्त वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर हा डीजेसोबत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच यावेळी गुलालही उडवण्यात आला. या अंत्ययात्रेची परिसरात खूप चर्चा होत आहे.
यावेळी डीजेच्या तालावर भोजपुरी होळी गीत वाजवण्यात आले. यावेळी मृताचे कुटुंबीय एक दुसऱ्याला गुलाल लावत नाचत होते. एक ट्रॅक्टर रंगीबेरंगी फुग्यांनी सजवला होता. मृतदेह ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. प्रथमच एवढी अंत्ययात्रा पाहून त्या मार्गावरून जाणारे लोकही बराच वेळ हे दृश्य आश्चर्याने पाहत होते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास कृष्णगढ ओपी क्षेत्रातील महुली गंगा घाट जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार पाहायला मिळाला. मुफस्सिल पोलीस ठाणे हद्दीतील बारा बसंतपुर गावातील रहिवासी सिद्धेश्वर पंडित यांचे 108 व्या वर्षी निधन झाले. यानंतर त्यांच्या अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय अंत्ययात्रा महुली गंगा घाट येथे घेऊन जात होते. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. डीजेच्या तालावर नाचताना दिसले.
advertisement
कुटुंबीय काय म्हणाले - 
याबाबत मृत सिद्धेश्वर पंडित यांचे पुत्र किशुन पंडित आणि कुटुंबीयांनी सांगितले की, माझे वडीलांचे 108 व्या वर्षी निधन झाले. पुत्र किशुन आणि नाती रोहित यांनी सांगितले की, त्यांच्या मृत्यूनंतर आम्हाला कोणतेही दु:ख नाही. आजकाल कोणीही 100 वर्षे जगत नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख होत नाही. त्यामुळे ट्रॅक्टरला सजवून आणि त्याची अंत्ययात्रा काढून आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत. मृतदेहासमोर एक डीजेही सुरू होता आणि याठिकाणी कुटुंबीय नाचल होते. या अंत्ययात्रेची परिसरात खूप चर्चा होत आहे.
मराठी बातम्या/Viral/
ही वरात नव्हे तर अंत्ययात्रा, तरी डीजेच्या तालावर नाचले लोक, नेमका काय हा प्रकार?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement