TRENDING:

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात चुरस, वरळीतील सहा वॉर्डांकडे लक्ष; बालेकिल्ला कुणाला देणार साथ?

Last Updated:

आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील 6 वॉर्डातील निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 19 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले.त्यामुळे महापालिकेच्या विजयाचे आडाखे बांधले जात होते. मात्र आता ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी वरळी मतदारसंघातच बंडखोरांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलं आहे.  आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील 6 वॉर्डातील निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. वरळी मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरेंना पालिका निवडणुकीत त्यांचा बालेकिल्ला मजबूत करायचा आहे. तर महायुतीलाही वरळीवर त्यांचा झेंडा फडकवायचा आहे.
News18
News18
advertisement

वरळीत वॉर्ड क्रमांक 193 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी दिली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रल्हाद वरळीकर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित नागवेकर आणि अपक्ष सूर्यकांत कोळी यांच्यात लढत होत आहे. वरळीकर यांच्यावर कोस्टल प्रोजेक्टमुळे मतदार नाराज आहेत. त्यातच 15 वर्ष शाखाप्रमुख असलेल्या सूर्यकांत कोळी मैदानात असल्यामुळे हेमांगी वरळीकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. झोपडपट्टी माफियांचा हैदोस आणि कोळीवाड्यात इतर धर्मीय आणि प्रांतीयांचं वाढणार अतिक्रमण हे मोठं संकट निर्माण झालंय. इथं मराठी भाषिक 60% तर इतर भाषिक 40% आहेत.

advertisement

वॉर्ड क्रमांक 195 

वॉर्ड क्रमांक 195 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमूख विजय भणगे मशाल चिन्हावर लढत आहेत. त्यांची लढत भाजपच्या राजेश कांगणे सोबत होते. या भागात बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू असून त्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. या वॉर्डात मराठी टक्का 65%, गुजराती 25% आहेत. तसंच काही प्रमाणात तेलुगु भाषक आहेत.

advertisement

वॉर्ड क्रमांक 196

वरळीतल्या वॉर्ड क्रमांक 196 मध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळतेय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पद्मजा चेंबूरकर, भाजपच्या सोनल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलम कांबळे, तर अपक्ष संगीता जगताप, प्रतिभा परब, आणि मानसी दळवी यांच्यात लढत होतेय. प्रेमनगर आणि सिद्धार्थ नगरच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हा इथला मुख्य प्रश्न आहे. सर्वाधिक चुरशीच्या या मतदारसंघात मराठी भाषिक सर्वाधिक 70% आहेत. तर मुस्लिम 15% आहेत.

advertisement

वॉर्ड क्रमांक 197

वॉर्ड क्रमांक 197 मध्ये मनसेच्या रचना साळवी, शिंदेंच्या शिवसेनेच्या वनिता नरवणकर आणि श्रावणी देसाई यांच्यात लढत होतेय. श्रावणी देसाईंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही यामुळे बंडखोरी केली आहे. पुनर्विकास, रेसकोर्स विकास, मद्रास वाडी आणि महात्मा फुले नगर पुनर्विकास हे इथले प्रश्न आहेत. या वॉर्डात 60 टक्के मराठी भाषिक, 20 टक्के मुस्लिम आणि इतर उत्तर भारतीय आहेत.

advertisement

वॉर्ड 198 

वॉर्ड 198 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अबोली खाडे, आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या वंदना गवळी यांच्यात थेट लढत होतेय. मराठी भाषिकांचं प्राबल्य असलेल्या या वॉर्डात चाळींच्या पुनर्विकासाचा मुख्य प्रश्न आहे. मात्र दोन्ही उमेदवार बाहेरच्या वॉर्डातील आहेत. वॉर्ड क्रमांक 199 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या रूपल कुसळे यांच्यात लढत होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फक्त 10 लाख रुपयांचा पेन, पुणेकरांसाठी मोफत प्रदर्शन, कधी आणि कुठं पाहता येणार?
सर्व पहा

मराठी बहुल असलेल्या या वॉर्डात धोबी घाट पुनर्विकास आणि चाळ पुनर्विकास हे मुख्य प्रश्न आहेत. वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे तीन आमदार आहेत. मात्र त्यांना पक्षातील बंडखोरी रोखता आली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर वरळीतल्या 6 वॉर्डात कोण बाजी मारतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

मराठी बातम्या/मुंबई/
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात चुरस, वरळीतील सहा वॉर्डांकडे लक्ष; बालेकिल्ला कुणाला देणार साथ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल