म्हाडाच्या येत्या सोडतीत वांद्रे (पूर्व) येथील एमआयजी कॉलनीच्या पुनर्विकास प्रकल्पातील काही घरांचा समावेश केला जाणार आहे. जेव्हा एखादी वसाहत पुनर्विकासासाठी जाते तेव्हा विकासक आणि म्हाडा यांच्यातील करारानुसार काही तयार घरे म्हाडाला परत मिळतात. ही घरे म्हाडा लॉटरी पद्धतीने सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देते.
वांद्र्यात घर मिळणं हे विशेष का असत?
1)कनेक्टिव्हिटी: वांद्रे हे मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण असून, बीकेसी, एअरपोर्ट आणि सी-लिंक मार्ग सहज उपलब्ध आहेत.
advertisement
2)लाइफस्टाइल: उत्तम शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स आणि हँगआउट स्पॉट्स इथे आहेत.
3)किंमत: म्हाडाची घरे खाजगी बिल्डर्सच्या तुलनेत परवडणारी असतात. सध्या ही घरे म्हाडाच्या आगामी सोडतीत समाविष्ट होतील. नेमकी किती घरे आणि कोणत्या उत्पन्न गटासाठी असतील, हे म्हाडा लवकरच जाहीर करेल.
तुम्ही ही संधी मिळवण्यासाठी कोणती तयारी कराल?
1)आपली कागदपत्रे अपडेट ठेवा (डोमिसाईल, उत्पन्न प्रमाणपत्र इ.).
2)म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर नियमित लक्ष ठेवा.
3)सेव्हिंग्ज आणि होम लोनची पात्रता तपासा. मुंबईत स्वतःचं घर घेण्याची ही मोठी संधी आहे. ही बातमी मित्र आणि नातेवाईकांशी नक्की शेअर करा.
