TRENDING:

ठाकरे बंधूंच्या सुपर सभेनंतर फडणवीस-शिंदे 'शिवतीर्था'वर, पण, 'तो' चेहरा बदलू शकले नाही!

Last Updated:

महायुतीच्या सभेच्या व्यासपीठावर मोठा बॅनर लावला आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहे. पण

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पालिकेत महायुती विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. ठाकरे बंधूंनी शिवतीर्थ अर्थात दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कवर विराट अशी सभा घेतली आणि चांगलीच गाजवली. अदानी यांच्यावर आरोपीमुळे ठाकरेंची सभा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. तर आज त्याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संयुक्त सभा होत आहे, पण ठाकरे बंधूंची सभा आणि महायुतीच्या  सभेत एक कॉमन गोष्ट समोर आली आहे.
News18
News18
advertisement

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर एकत्र सभा घेतली. ही सभा गाजली ती राज ठाकरे यांच्या कडक भाषणामुळे. राज ठाकरे यांनी अदानी समुहाने देशभरात कशा प्रकारे पसरला याचा पुरावाच राज ठाकरेंनी दिला. आता त्याच ठिकाणी महायुतीची सभा होत आहे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. पण, व्यासपीठावर एकच गोष्ट कॉमन असल्याचं समोर आलं आहे.

advertisement

महायुतीच्या सभेच्या व्यासपीठावर मोठा बॅनर लावला आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहे. पण, या फोटोसोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो व्यासपीठाच्या बॅनरवर आहे.

ठाकरे बंधूंच्या सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे हे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून आहे, असा फोटो लावला जात आहे. रविवारच्या सभेतही हाच फोटो होता. आता महायुतीच्या सभेत बाळासाहेबांचा फोटो वापरण्यात आला आहे.

advertisement

उद्धव ठाकरेंनी फोटोवर अनेक वेळा घेतला आक्षेप

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटाने बाळासाहेबांचे फोटो आपल्या बॅनवर वापरले आहे. शिवसेना शिंदे गटाने आनंद दिघे यांच्यासोबत बाळासाहेबांचा फोटो नेहमी वापरत आहे. या फोटो वापरण्यावरून उद्धव ठाकरे यांनी  'माझ्या बापाचा फोटो वापरण्याऐवजी तुमच्या बापाचा फोटो लावा ना' असं म्हणत अनेक वेळा टीका केली आहे. पण, आमची शिवसेनाही बाळासाहेबांच्या विचारांची आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे फोटो वापरणारच असं ठणकावून सांगितलं.

advertisement

भाजपची काय भूमिका? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, सोयाबीन आणि कांद्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

मागील विधानसभा आणि लोकसभा, पालिका निवडणुकीत जेव्हा शिवसेना आणि भाजपचं बिनसलं होतं. त्यावेळी शिवसेनेनं बाळासाहेबांचा फोटो वापरून मत मागितली अशी टीका केली होती. तर भाजपनेही पंतप्रधान मोदी यांचा फोटो वापरून शिवसेनेनं प्रचार केला होता, अशी टीका केली होती. विधानसभा आणि स्थानिक निवडणुकीत हा वाद चांगलाच पेटला होता. आता शिंदेंची शिवसेनाही भाजपसोबत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी हीच ऑरिजनल शिवसेना आहे, ती आपल्यासोबत आहे, अशी भूमिका मांडली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
ठाकरे बंधूंच्या सुपर सभेनंतर फडणवीस-शिंदे 'शिवतीर्था'वर, पण, 'तो' चेहरा बदलू शकले नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल