अजित पवार अडचणीत येणार?
राज्यातील शिखर बँकेचा 25000 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच माणिकराव पाटील आणि इतर 74 यांच्या वतीने दाखल प्रोटेस्ट याचिकेवर युक्तिवाद होणार आहे. तपास यंत्रणांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात येणार आहे. अजित पवारांचं नाव वगळल्याबद्दल हा आक्षेप आहे.
advertisement
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज पाथर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.
कांदा लागवडीत घट
कांद्याबाबत केंद्राच्या शासनाचे धरसोड धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी निराश झाला आहे. सतत हस्तक्षेप आणि वारंवार अचानक करण्यात येत असलेली निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे पाठ फिरवू लागला आहे. परिणामी यंदा नाशिक जिल्हा, महाराष्ट्रचं नव्हे तर देशपातळीवर कांदा लागवडीत 30 टक्क्यांनी घट झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज धारशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. ज्ञानराज चौगुले यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले असताना मुख्यमंत्री हा दौरा करणार आहेत.
वाचा - उद्धव ठाकरेंचा 'मोठा मासा' भाजपच्या गळाला? गुप्त भेटीनंतर चर्चांना उधाण
49 वर्षानंतर जगप्रसिध्द पैलवान उतरणार चंद्रपूरातील दंगलीत
1975 साली चंद्रपूरातील कोहिनूर तलावाच्या मैदानावर जगप्रसिध्द पैलवानात मुकाबला झाला होता, यानंतर आता आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख आणि हरियाणा केसरी जस्सा छोटा या जगप्रसिध्द पैलवानांच्या लढतीचे 17 फेब्रुवारी 2024 ला महाकाली मंदिराच्या पटांगणात आयोजन होणार आहे.