पोलीस आरोपी अक्षयला चौकशीसाठी जेलमधून घेऊन जात असताना अक्षयने जीपमधील पोलिसाच्या कंबरेवरील बंदूक हिसकावून तीन राऊंड फायर केले. यावेळी दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रत्युरादाखल अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अक्षयला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही वेळातच वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात जाणार असल्याची माहिती आहे.
advertisement
नेमकी घटना कशी घडली?
तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांजवळील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कंबरेवरील बंदूक खेचून निलेश मोरे यांच्यावर अक्षयने 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात गेली तर 2 गोळ्यांचा वेध चुकला.
जखमी निलेश मोरेने त्याही परिस्थितीत अक्षय शिंदे याला प्रत्युत्तर दिले. सोबत असलेले दुसरे अधिकारी, पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला. त्यावेळी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली. दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं.
दरम्यान,अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे. पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाही.
